adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कुख्यात आरोपीचा पिस्तूलातून गोळीबार…दोन गट आमने सामने पोलिसांची धडक कारवाई..अवघ्या काही तासातच आरोपी जेरबंद

 कुख्यात आरोपीचा पिस्तूलातून गोळीबार…दोन गट आमने सामने पोलिसांची धडक कारवाई..अवघ्या काही तासातच आरोपी जेरबंद  सचिन मोकळं अहिल्यानगर/शेवगाव प...

 कुख्यात आरोपीचा पिस्तूलातून गोळीबार…दोन गट आमने सामने पोलिसांची धडक कारवाई..अवघ्या काही तासातच आरोपी जेरबंद 


सचिन मोकळं अहिल्यानगर/शेवगाव प्रतिनिधी:-

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बोधेगाव येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील परस्पर विरोधी गुन्ह्यातील आरोपींना शेवगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे.दि.१५/०३/२०२६ रोजी शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बोधेगाव येथे आरोपी पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे याने त्याचे साथीदारांसह फिर्यादी गणेश रमेश कापसे यांच्यावर जीव घेण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार करून जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानुसार फिर्यादी गणेश रमेश कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. २१९/२०२६ प्रमाणे विविध कलमा सह  आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील आरोपी भारत ज्ञानदेव कापसे रा. अंतरवली बुद्रुक,ता.शेवगाव हा घराच्या मागच्या बाजूने शेतातून पळून जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे हे करीत आहे.तसेच आरोपी पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे रा.अंतरवली ता.शेवगाव हा त्याच्या चारचाकी वाहनामध्ये डिझेल भरून मित्रांसोबत मुंडे चौकात चहा पीत असताना आरोपी नितीन मनोहर काकडे, संग्राम नितीन काकडे,दत्तात्रय हरिश्चंद्र तहकिक व राजू बागवान यांनी त्याला लोखंडी गज,काठी व अन्य शस्त्रांनी मारहाण करून जखमी केले.याप्रकरणी सुरेश भारत कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. २१८/२०२६ भादंवि कलम ३/२५  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय हरिश्चंद्र तहकिक याला लाडजळगाव येथून पळून जाताना अटक करण्यात आली असून,या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलूबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर,पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप,पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले,पोलीस अंमलदार राजू ससाने,पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र कर्डिले,ईश्वर गर्जे,सोमीनाथ बांगर,परशुराम नाकाडे,सचिन नवगिरे,शाम गुंजाळ,भगवान सानप,राजू बडे, प्रशांत आंधळे,ईश्वर बेरड,राहुल खेडकर,राहुल आठरे,रोहित पालवे,नकुल फलके,अर्जुन मुंडे, वसंत वैद्य,गणेश बांगर,नवनाथ कोठे व नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांनी सहभाग घेतला आहे.

No comments