adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावद्यातील फवाद खानचे सलग तिसऱ्या वर्षी रमजानचे पूर्ण रोजे; परिसरात कौतुक

 सावद्यातील फवाद खानचे सलग तिसऱ्या वर्षी रमजानचे पूर्ण रोजे; परिसरात कौतुक  मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सावदा : येथील जमा...

 सावद्यातील फवाद खानचे सलग तिसऱ्या वर्षी रमजानचे पूर्ण रोजे; परिसरात कौतुक 


मुबारक तडवी रावेर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सावदा : येथील जमादार मोहल्ला परिसरातील फवाद खान साकीब खान (वय ११ वर्षे) याने पवित्र रमजान महिन्यात संपूर्ण महिन्याचे रोजे यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, विशेष म्हणजे त्याने सलग तिसऱ्या वर्षी ही श्रद्धा कायम राखली आहे.

लहान वयातच धार्मिक निष्ठा, संयम आणि शिस्त यांचे उत्कृष्ट उदाहरण घालत फवादने सर्व रोजे पूर्ण केले. त्याच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांकडून त्याचे मनापासून कौतुक करण्यात येत आहे.

फवादच्या या यशामुळे इतर मुलांनाही प्रेरणा मिळत असून, श्रद्धा आणि चिकाटीच्या बळावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, याचे उत्तम उदाहरण त्याने घालून दिले आहे.

No comments