adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावखेडा येथे युवकांचा भीम आर्मीमध्ये प्रवेश सोहळा

 सावखेडा येथे युवकांचा भीम आर्मीमध्ये प्रवेश सोहळा  तालुका प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील सावखेडा येथे भीम आर्मी ...

 सावखेडा येथे युवकांचा भीम आर्मीमध्ये प्रवेश सोहळा 


तालुका प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील सावखेडा येथे भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने भव्य प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. संस्थापक खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत असंख्य युवकांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला. आक्रमक, कणखर आणि दमदार नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश  सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, रावेर तालुका प्रमुख राहुल निंभोरे तसेच फैजपूर शहराध्यक्ष मोसिम तडवी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश  सपकाळे यांच्या हस्ते रईस तडवी, दस्तुर तडवी, आसिफ तडवी यांच्यासह अनेक युवकांचा प्रवेश करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक न्याय, समानता आणि संविधानिक मूल्ये यांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मोठ्या संख्येने युवकांनी संघटनेच्या विचारांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना गणेश  सपकाळे म्हणाले की, “भीम आर्मी ही सामाजिक संघटना असून कोणत्याही प्रकारच्या अन्याय व अत्याचाराविरोधात ती नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असते. संपूर्ण जळगाव जिल्हा भीम आर्मीमय करण्याचा आमचा संकल्प असून प्रत्येक गावात संघटना मजबूत केली जाईल. युवकांच्या ताकदीवर सामाजिक परिवर्तन घडवून आणू.” प्रवेश सोहळ्याबाबत अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना जिल्हा प्रसिद्ध प्रमुख प्रबुद्ध खरे व राहुल जयकर यांनी दिली.

No comments