adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडयातील महावीर नगरातील जागृत देवस्थान ॐसिध्देश्वर महादेव मंदिरात साक्षात्कार..८० वर्षीय बाबांचा ८ मार्चला ११०० लोकांना नवसफेड भंडारा

 चोपडयातील महावीर नगरातील जागृत देवस्थान ॐसिध्देश्वर महादेव मंदिरात साक्षात्कार..८० वर्षीय बाबांचा ८ मार्चला ११०० लोकांना नवसफेड भंडारा   चो...

 चोपडयातील महावीर नगरातील जागृत देवस्थान ॐसिध्देश्वर महादेव मंदिरात साक्षात्कार..८० वर्षीय बाबांचा ८ मार्चला ११०० लोकांना नवसफेड भंडारा  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

(चोपडा) शहरातील महावीर नगरातील अत्यंत जागृत असलेले देवस्थान ओम सिद्धेश्वर महादेव मंदिरात वर्धापन दिनाचे औचित्य साधत 80 वर्षीय वृद्ध इसमास इच्छापूर्ती झाल्याने त्यांच्याकडून  दिनांक 8 मार्च रोजी महा भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  

महावीर नगरातील रहिवासी ऐंशी वर्षीय वृद्ध बाबा श्री. रणछोडदास लोहार हे काही दिवसापूर्वी रस्त्यावर चालत असताना जमिनीवर कोसळले त्यात त्यांच्या पाठीचा कणा मोडला गेला त्यानंतर बाबा हे नामांकित  डॉक्टरांकडे गेले असता डॉक्टरांनी आता हे हाड वयोमानानुसार जोडणे अशक्य असल्याचे सांगून कमरपट्टा व औषध देऊन मोकळे झाले.मात्र बाबांनी हार न मानता कसेबसे चालत ओम सिद्धेश्वर महादेव मंदिरात सेवा सुरू ठेवली दररोज नित्याने सकाळी 4:00 वाजता जाऊन पूजा अर्चा व सेवा करू लागले.अन् चमत्कार घडावा असा प्रकार होऊन बाबा काही दिवसात  पूर्ववत चालायला लागले त्यामुळे बाबांचा भोले बाबा विषयी विश्वास पक्का होऊन भोलेनाथ कृपेने मी आज कोणताही वैद्यकीय खर्च न करता चालू शकतो आहे असा दावा केला आहे.ॐसिध्देश्वर महादेव हे मंदिर जागृत देवस्थान असून मी मानलेला ११०० लोकांचा महाप्रसादाचा नवस मी फेडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यापूर्वीही या मंदिरातील देव दर्शनाने परिसरातील काही भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.

या मंदिरात आदर्श नगर, पंकज स्टॉप,बोरोलेनगर, सुदर्शन कॉलनी आदी परिसरातील भोले भक्तांचाही देव दर्शनासाठी कल वाढू लागला आहे.याआधीही नाशिक येथील पार्मार्थिक संत महंतांनी लाईव्ह लोकेशनवरून मंदिर जागृततेविषयी भाकीत वर्तवले आहे.

..............................................................................

रणछोडदास लोहार या बाबांची परिस्थिती अत्यंत हलाखीच्या असून देखील पै पै जमा करून  नवस फेडण्यासाठी ते पुढे आले आहेत. जेमतेम परिस्थिती असल्यावरही एव्हढा मोठा खर्च करीत असल्याचे रहिवाश्यांनी त्यांच्याअसीम श्रध्देचे तोंड भरून कौतुक केले आहे. शुद्ध मनाने एक वेळ या मंदिरात भेट देऊन "भगवान भोले बाबां"चे दर्शन घेऊन पाहा तुमची इच्छा सत्यात उतरल्या शिवाय राहणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे.

No comments