adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रुग्णसेवा करतच थांबला जीवनप्रवास; पत्रकार सुप्रिया ताई ठोंबरे यांचे अचानक निधन, पत्रकार क्षेत्रांतून शोककळा!

  रुग्णसेवा करतच थांबला जीवनप्रवास; पत्रकार सुप्रिया ताई ठोंबरे यांचे अचानक निधन, पत्रकार क्षेत्रांतून शोककळा!  संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी ...

 रुग्णसेवा करतच थांबला जीवनप्रवास; पत्रकार सुप्रिया ताई ठोंबरे यांचे अचानक निधन, पत्रकार क्षेत्रांतून शोककळा! 



संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी मुंबई : --

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


सामाजिक जाणिवा जपत पत्रकारितेतून समाजप्रबोधन करणाऱ्या दैनिक लोकपरिवार समाचारच्या उपसंपादिका तथा पत्रकार सुप्रिया ताई ठोंबरे यांचे अचानक आकस्मित निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत असून संवेदनशील आणि समाजाभिमुख पत्रकार म्हणून ओळख असलेली एक जिद्दी व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली आहे.

सुप्रिया ठोंबरे यांनी पत्रकारितेच्या माध्यमांतून समाजातील विविध प्रश्न मांडत जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांच्या लेखणीतून सामाजिक विषयांना नेहमीच प्राधान्य मिळत असे. समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले होते. त्यामुळे पत्रकारितेत त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.

पत्रकारितेबरोबरच समाजसेवेची जाण जपणाऱ्या सुप्रिया ठोंबरे या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत. त्यांच्या कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली होती. समाजासाठी संवेदनशीलतेने काम करणारी एक जबाबदार पत्रकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रोखठोक महाराष्ट्र धमाका ग्रुपचे संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली आहे. ताई यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की,


“पत्रकार सुप्रिया ताई ठोंबरे यांनी समाजाभिमुख पत्रकारितेतून अनेक प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या संवेदनशील लेखणीमुळे समाजाला दिशा मिळत होती. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.”


संवेदनशील लेखणी, समाजाबद्दलची बांधिलकी आणि पत्रकारितेतील त्यांचे योगदान समाजाच्या स्मरणात कायम राहील. रोखठोक महाराष्ट्र धमाका ग्रुपकडूंन जड अंतःकरणाने 

भावपूर्ण श्रद्धांजली!

No comments