adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप*

 *अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप* जळगाव- (प्रतिनिधी) :– (संपादक :- ...

 *अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप*





जळगाव- (प्रतिनिधी) :–

(संपादक :- हेमकांत गायकवाड)



 जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज (दि. 14 मार्च 2026) सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. तहसील कार्यालय एरंडोल येथे कार्यरत असलेले दिवंगत महसूल सहाय्यक कै. शिवाजी महाजन यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर जिल्हाभरातील महसूल कर्मचारी बांधवांनी एकत्रितपणे मदत निधी जमा केला होता.

या निधीतून ₹2,64,000 (रुपये दोन लाख चौसष्ट हजार) इतकी मदत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते दिवंगत महाजन यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आली.

यानंतर जळगाव शहरातील कन्या छात्रालयातील एकूण 42 विद्यार्थिनींना शालेय दप्तर, वह्या, कंपास साहित्य व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा जळगाव यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. तसेच जळगाव शहरातील दानशूर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

या कार्यक्रमास महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगेश्वर नन्नवरे, उपाध्यक्ष किरण बाविस्कर, कार्याध्यक्ष अतुल सानप, खजिनदार घनश्याम सानप, सरचिटणीस दिपक चौधरी, प्रसिद्धी प्रमुख गणेश हटकर, कायदेविषयक सल्लागार नम्रता नेवे, जळगाव तालुका अध्यक्ष संजय अंभोरे, ॲड. दीपक सपकाळे, भारतीय स्टेट बँकेचे गजानन पाटील, कॅनरा बँकेचे चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रदीप बाविस्कर, रितेश छाजेड तसेच व्यावसायिक सदस्य राहुल नवगिरे, महेश सपकाळे, सुरेश महाले, महेश विसपुते, सुनिल निकम, चंद्रकांत खैरे, निलेश केदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक अमोल जुमडे यांनी पार पडली...

No comments