adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महिला दिनानिमित्त नारी परिवर्तन संस्थेचे विविध उपक्रम; पिंक वॉकथॉनमध्ये सहभाग व वृक्षारोपण

  महिला दिनानिमित्त नारी परिवर्तन संस्थेचे विविध उपक्रम; पिंक वॉकथॉनमध्ये सहभाग व वृक्षारोपण  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायक...

 महिला दिनानिमित्त नारी परिवर्तन संस्थेचे विविध उपक्रम; पिंक वॉकथॉनमध्ये सहभाग व वृक्षारोपण 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेगाव : जागतिक महिला दिनानिमित्त (८ मार्च) नारी परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंक वॉकथॉन स्पर्धेत संस्थेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

याच अनुषंगाने चिंचोली येथे “झाडे लावा, झाडे जगवा” या संकल्पनेतून वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महिला दिनाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय खेळाडू जयश्री शेट्टे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. चेतना खेते, उपाध्यक्ष प्रणिता कलोरे, सचिव देवका उंबरकर, सहसचिव योगिता बोरोकार, कोषाध्यक्ष रेणू जोशी तसेच सदस्य सोनाली दिखोळकर, शोभा भोपळे आदी उपस्थित होत्या.

या विविध उपक्रमांमुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला.

No comments