adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सिव्हील रुग्णालयात उपचारादरम्यान अनोळखी इसमाचा मृत्यू नातेवाईकांचा शोध सुरू..कोतवाली पोलिसांचे आवाहन ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे

 सिव्हील रुग्णालयात उपचारादरम्यान अनोळखी इसमाचा मृत्यू नातेवाईकांचा शोध सुरू..कोतवाली पोलिसांचे आवाहन ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे ...

 सिव्हील रुग्णालयात उपचारादरम्यान अनोळखी इसमाचा मृत्यू नातेवाईकांचा शोध सुरू..कोतवाली पोलिसांचे आवाहन ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सुमारे ५० वर्षे वयाच्या अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नवनाथ जराड (वय अंदाजे ५० वर्षे, रा.डीकसळ) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले जाते. या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात दि.४ मार्च २०२६ रोजी सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.वैद्यकीय अधिकारी, सिव्हील हॉस्पिटल,अहिल्यानगर यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित इसमाला दि.५ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.२० वाजता उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.मृत व्यक्तीचे वर्णन असे –

सावळा वर्ण, बारीक बांधा, काळे-पांढरे केस, उंची अंदाजे १६५ सेंमी. अंगात निळ्या रंगाचा पँट, गोल गळ्याचा पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, तसेच निळ्या आकाशी रंगाचे अंडरवेअर परिधान केलेले आहे. नाक सरळ असून पुढील बाजूस मोठे तर डाव्या बाजूस मध्यम आकाराचे कान आहेत.या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा अथवा ओळखीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून कोणाला माहिती असल्यास कोतवाली पोलिस ठाणे, अहिल्यानगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोतवाली पोलीस स्टेशन ०२४१-२४१६११७

No comments