adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाळधी गावात चोरांचा थैमान; पशु चोरींनी गावकरी हैराण

 पाळधी गावात चोरांचा थैमान; पशु चोरींनी गावकरी हैराण   जळगाव प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) पाळधी (ता. धरणगाव) : पाळधी गावाच्या शिवारात ...

 पाळधी गावात चोरांचा थैमान; पशु चोरींनी गावकरी हैराण  


जळगाव प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

पाळधी (ता. धरणगाव) : पाळधी गावाच्या शिवारात अलीकडे पशु चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पशुपालक वर्ग मोठ्या चिंतेत असून प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

दिं. २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ०१:३५ वाजेच्या सुमारास गावातील एका पशुमालकाच्या घरासमोरून गायीचे वासरू (गोह्रा) अज्ञात चोरट्यांनी कारमधून येत अत्यंत निंदनीय पद्धतीने उचलून नेले. वासराला जबरदस्तीने कारमध्ये टाकून चोरी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


ही संपूर्ण घटना घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये संशयित वाहन आणि व्यक्तींची हालचाल स्पष्टपणे दिसून येत आहे. या आधीही गावात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सततच्या चोरीमुळे पशुमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आपल्या जनावरांच्या सुरक्षेबाबत ते साशंक झाले आहेत. ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाने तात्काळ तपास करून चोरट्यांना अटक करावी व अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, संबंधित घटनेचा तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गावकऱ्यांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. 


No comments