adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याचा भव्य आयोजन

 जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याचा भव्य आयोजन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विटनेर ता. ...

 जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याचा भव्य आयोजन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विटनेर ता. चोपडा जि. जळगाव येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक आनंददायी शैक्षणिक उपक्रम होता. आनंदमेळाव्याचे चे उद्घाटन विटनेर गावाच्या सरपंच सौ कविता मंगल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील बहुसंख्य नागरिक, पालक,माजी विद्यार्थी, यांनी उपस्थिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमंत भामरे , श्री विकास पाटील, शिक्षिका सौ मनीषा पाटील, श्री प्रवीण पाटील व श्री हेमंत पाटील यांनी नियोजन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः खाद्यपदार्थ वस्तूंचे स्टॉल लावले. 'कमवा व शिका' संकल्पनेतून व्यवहारज्ञान, उद्योजकता आणि आत्मविश्वास शिकले. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ बनवले आणि त्यांची विक्री केली. या विक्रीच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांचा नफा, तोटा, व्यावहारिक ज्ञान,संवाद कौशल्य इत्यादी गुणांचा विकास झाला. विद्यार्थ्यांनी जवळपास 2800 रुपये एवढं उलाढाल या आराम मिळण्याच्या माध्यमातून झाली.

या मेळाव्याच्या माध्यमातून "प्रगती रवींद्र कोळी हिच्या फेसबुक पाणी पुरी या स्टॉल चा प्रथम क्रमांक आला" तिने एकूण 370 रुपयाचा व्यवसाय करत 210 रुपये नफा मिळवला,द्वितीय क्रमांक निर्भय मच्छिंद्र कोळी याच्या चवदार सोयाबीन बिर्याणी या स्टॉल चा आला असून तृतीय क्रमांक अंजली गुणवंत कोळी हिच्या "विटनेर चा स्वादिष्ट साबुदाणा वडा" या स्टॉल ला मिळाला.. हा कार्यक्रम मुलांमधील स्नेहभावना वाढवण्यास आणि हसतखेळत शिक्षण घेण्यास मदत करणारा ठरला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या या अनोख्या आयोजनाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सरपंच कविता मंगल पाटील म्हणाल्या की, "बाल आनंद मेळावा हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक उत्तम उपक्रम आहे. यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, उद्योजकता, आणि आत्मविश्वास यासारखे महत्त्वाचे गुण शिकायला मिळतात."

No comments