उनपदेव येथे भोंगऱ्या आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला : मा. आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते भोंगऱ्या देवाची पूजा करून शुभारंभ...
उनपदेव येथे भोंगऱ्या आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला : मा. आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते भोंगऱ्या देवाची पूजा करून शुभारंभ
अडावद प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद ता. चोपडा:- जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार उनपदेव अडावद येथे भरला आहे. लाखाच्यावर यात्रेकरू व शेकडो ढोल पथक आपल्या पाड्या वास्त्यावरील आदिवासी बंधू भगिनीं अबाल वृद्ध उपस्थित होते. ढोलाच्या सुमधुर नाद निनादत होता. त्यात भान हरपून आदिवासी नृत्य करताना दिसत होते. तसेच वर्षभरातून एकदा या बाजारातून अनेक चीज वस्तू खरेदी करीत होते.
१० रोजी दुपारी बारा वाजता शरभंगऋषी पाडा येथे भोंगऱ्या उत्सवाचा प्रारंभ माजी आमदार लताताई सोनवणे व जळगाव मनपा नगरससेविका डॉ. अमृताताई सोनवणे यांच्या हस्ते भोंगऱ्या देवाची (बोपदेव) पूजा करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी, शरभंग पाड्याचे पोलीस पाटील देवासिंग पावरा, संजीव शिरसाठ आदिवासी समाज सेवक चोपडा ' ॲड स्मिताताई झाल्टे उपाध्यक्षा वकील बार असोसियन जळगाव ' सुरेश कोहली कार्यकारी संपादक क्राहिम बुलेट न्युज ' खुमसिंग बारेला 'गाव डाया गजीराम पावरा, रमेश बारेला , चंद्रशेखर साळुंखे सर , दिलीप बारेला 'शेवरे बुद्रुकचे पोलीस पाटील गणदास बारेला, माजी विकासो चेअरमन सचीन महाजन, हरिष पाटील, मनोहर पाटील, लोकेश काबरा, कालू मिस्तरी, जावेदखाँ पठाण, उमेश कासट गोपाल बाविस्कर, पी आर माळी, मेलाणे सरपंच प्रताप पावरा, पिंटु पावरा ' पत्रकार जितेंद्र कुमार शिंपी , रोहिदास मोरे, महेश गायकवाड ' रफीक मन्यार, दशरथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रायसिंग पावरा, रमेश बारेला, गजाराम पावरा, खुमसिंग पावरा, गाठ्या बारेला, दिलीप बारेला, शेवरे बु.चे पोलीस पाटील गणदास बारेला, भायसी बारेला, मंगला बारेला, आमली बारेला, समरा बारेला, गुड्डी बारेला , अंबीबाई बारेला, दुर्गाबाई बारेला, वाकडीबाई बारेला , सुकलाल बारेला, भागीराम बारेला , सागर पावरा, रतन पावरा, प्रताप बारेला, गेलसिंग बारेला, जगन महाराज यांचेसह अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते.
लाखोंची झाली उलाढाल
आदिवासी बांधव या उत्सवात नवे कपडे परिधान करून येतात या उत्सवात दाळ्या, फुटाणे, साखरेचे हार, कंगण, जलेबी, फळे, महिलांचे दागिने, असे मोठा प्रमाणावर खरेदी विक्री होते. टॅटू गोंधणारे, फोटो काढणारे, कुल्फीवाले, तसेच इतर शीतपे्यांचे दुकानें मोठ्या प्रमाणावर होती. यात लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे जाणकार सांगतात.
चोख पोलीस बंदोबस्त
या भोंगऱ्या बाजारात अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

No comments