हातेड शाळेत येथे ‘रंग तरंग २०२६’ उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा देखणा आविष्कार शामसुंदर सोनवणे हातेड /चोपडा (संपादक -:- हे...
हातेड शाळेत येथे ‘रंग तरंग २०२६’ उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा देखणा आविष्कार
शामसुंदर सोनवणे हातेड /चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : तालुक्यातील हातेड येथील श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळेत आयोजित ‘रंग तरंग २०२६’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करत आपल्या सुप्त कलागुणांचा उत्कृष्ट आविष्कार घडवून उपस्थितांची मनं जिंकली.
यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती अंजली बर्वे मॅडम, गटशिक्षणाधिकारी श्री. अजितदादा रामराव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. राजमल महाजन साहेब तसेच केंद्र प्रमुख श्री. पुरुषोत्तम विठ्ठलराव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाटिका आदी विविध सादरीकरणांद्वारे आपली कला सादर केली. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामपंचायत हातेड बुद्रुक, हातेड खुर्द व गलवाडे येथील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. एकूणच ‘रंग तरंग २०२६’ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.


No comments