कुंचल्याचा सन्मान अन् कर्तृत्वाचा गौरव! चित्रकार सुनील दाभाडे यांनी रेखाटले जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे हुबेहूब तैलचित्र जळगाव प्रतिनिधी ...
कुंचल्याचा सन्मान अन् कर्तृत्वाचा गौरव! चित्रकार सुनील दाभाडे यांनी रेखाटले जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे हुबेहूब तैलचित्र
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव: प्रशासकीय कामाचा झपाटा आणि जनसामान्यांशी असलेली नाळ यामुळे अल्पावधीतच जळगावकरांची मने जिंकणारे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना नुकतीच एक अनोखी कलाभेट मिळाली. प्रसिद्ध चित्रकार आणि उपक्रमशील शिक्षक सुनिल दाभाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन त्यांचे एक जिवंत वाटावे असे तैलचित्र (Oil Painting) साकारले. हे चित्र पाहून जिल्हाधिकाऱ्यांनीही सुनिल दाभाडे यांच्या कलेची "कलेची दाद" घेत मनापासून कौतुक केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेला हा सोहळा केवळ औपचारिक भेट नसून, तो कला आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा एक सुखद अनुभव ठरला. सुनिल दाभाडे यांनी कॅनव्हासवर उमटवलेले जिल्हाधिकाऱ्यांचे हुबेहूब रेखाटन पाहून उपस्थित सर्वच थक्क झाले. सुनिल दाभाडे यांनी केवळ चेहराच नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील शांतता आणि कणखरपणाही आपल्या कुंचल्याने समर्थपणे मांडला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, "जेव्हा समाजातला एखादा कलाकार आपल्या कामाची दखल घेऊन अशा प्रकारे आपली कला सादर करतो, तेव्हा कामाचा उत्साह द्विगुणित होतो." सुनिल दाभाडे यांनी ही भेट देऊन केवळ त्यांचा सन्मान केला नाही, तर जळगावच्या समृद्ध कलासंस्कृतीचे दर्शनही घडवले आहे. या आनंदमयी सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते डॉ. आर. एस. डाकलिया (अध्यक्ष, मानव सेवा मंडळ जळगांव), विश्वनाथ जोशी (मानद सचिव) , सुभाष पाटील (सदस्य), प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर,बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी. शिक्षक आणि चित्रकार म्हणून सुनिल दाभाडे यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

No comments