adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भक्ती आणि जिद्द! सात वर्षांच्या अनशरा शोयेब सय्यदचा पहिला रोजा पूर्ण

 भक्ती आणि जिद्द! सात वर्षांच्या अनशरा शोयेब सय्यदचा पहिला रोजा पूर्ण  अंबाजोगाई प्रतिनिधी - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पवित्र रमजान महिन्...

 भक्ती आणि जिद्द! सात वर्षांच्या अनशरा शोयेब सय्यदचा पहिला रोजा पूर्ण 


अंबाजोगाई प्रतिनिधी -

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, अंबाजोगाई येथील सात वर्षीय चिमुरडी अनशरा शोयेब सय्यद हिने आपला आयुष्यातील पहिला रोजा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पूर्ण केला आहे. उन्हाळ्याची चाहूल आणि मोठी वेळ असतानाही इतक्या लहान वयात दाखवलेल्या या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अवघ्या सात वर्षांच्या अनशराने पहाटेच्या 'सहरी'पासून ते सायंकाळच्या 'इफ्तार'पर्यंत निर्जळी उपवास (रोजा) पकडून आपली धार्मिक निष्ठा जपली.

अनशराच्या या पहिल्या रोजानिमित्त तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या जिद्दीला आई-वडील,आजी, मामा, मामी, चुलते, मावस बहिण भाऊ आणि नातेवाईकांनी प्रोत्साहन दिले. रमजानच्या या पवित्र महिन्यात लहान मुलांमध्येही उपवास करण्याची ओढ असते, मात्र वयाच्या सातव्या वर्षी कडक रोजा पाळणे हे तिच्या संयमाचे प्रतीक मानले जात आहे. सायंकाळी मशिदीतून अजान होताच अनशराने खजूर खाऊन आपला रोजा सोडला. यावेळी तिच्या मित्र-मैत्रिणींनी आणि नातेवाईकांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या या यशाबद्दल तिला विशेष भेटवस्तू देऊन तिचे कौतुक करण्यात आले."एवढ्या लहान वयात अनशराने दाखवलेली सहनशीलता आणि भक्ती खरोखरच प्रेरणादायी आहे."

No comments