adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पिंपरी आश्रम शाळेतील बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला; परिसरात खळबळ

 पिंपरी आश्रम शाळेतील बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला; परिसरात खळबळ.  त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी – जयवंत हागोटे (स...

 पिंपरी आश्रम शाळेतील बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला; परिसरात खळबळ. 


त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी – जयवंत हागोटे

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी परिसरात एका विद्यार्थ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ मार्चपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह आश्रम शाळेच्या मागील बाजूस आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

संजय सदू नडगे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथील स्व. मधुकरराव हिरे अनुदानित आश्रम शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. गेल्या तीन दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. कुटुंबीय आणि स्थानिकांकडून त्याचा शोध सुरू असतानाच शाळेच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. 

घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर पुढील तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आश्रम शाळा परिसरात तसेच पिंपरी गावात शोककळा पसरली असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

No comments