adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्जाणे - धवली पूल व कजाऀणे - बोरमळी रस्ता कामे माजी आमदार सौ.लताताई सोनवणे व प्रा.चंद्रकात सोनवणे यांच्याच प्रयत्नांचे फलित...

 कर्जाणे - धवली पूल व  कजाऀणे - बोरमळी रस्ता कामे माजी आमदार सौ.लताताई सोनवणे व प्रा.चंद्रकात सोनवणे यांच्याच प्रयत्नांचे फलित...  प्रतिनिधी...

 कर्जाणे - धवली पूल व  कजाऀणे - बोरमळी रस्ता कामे माजी आमदार सौ.लताताई सोनवणे व प्रा.चंद्रकात सोनवणे यांच्याच प्रयत्नांचे फलित... 


प्रतिनिधी कैलास बाविस्कर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा (दि.२३) कर्जाने- धवली  पुल व कजाऀणे -बोरमळी रस्ता ही  आदीवासी  भागात मंजूर झालेले विकास कामे ही माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्याच प्रयत्नांनी मंजूर झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी २०२३ ला माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांना पत्र देऊन आदिवासी घटक  रस्ते व  दुरुस्ती सुधारणा योजनेअंतर्गत ही कामे मंजुर केली होती.परंतु वनविभागाच्या नाहरकतीअभावी ही कामे प्रलंबीत होती. वनविभागाची नाहरकत मिळाल्यानंतर या कामांवरील निधी शासनाकडे परत गेल्याने या कामांना सुरुवात झाली नव्हती. त्यासाठी या कामांना निधी मिळविण्यासाठी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आदिवासी विकासमंत्री मा. ना. अशोक उईके साहेब व कक्षाधिकारी यांना सप्टेबर २०२५ व नोव्हेंबर २०२५ ला पत्र व्यवहार करुन या व इतर  कामांसाठी निधी मंजुर करून त्याबाबत  शासन निर्णय  काढणे साठी  पाठपुरावा केला.    ही कामे  मंजुर करण्यासाठी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी वारंवार पाठपुरावा करुन  या कामांसाठी निधी मिळविला.

No comments