विवेकानंद विद्यालयाची काव्यांजली पाटीलची चित्रकलेत झेप; उत्तराखंड स्पर्धेत तृतीय क्रमांक चोपडा (प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) च...
विवेकानंद विद्यालयाची काव्यांजली पाटीलची चित्रकलेत झेप; उत्तराखंड स्पर्धेत तृतीय क्रमांक
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातील इयत्ता दुसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु. काव्यांजली अनिलराज पाटील हिने उत्तराखंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘मिट्टी से रंग तक’ या सांस्कृतिक संस्थेतर्फे 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय तिरंगा आणि देशभक्ती कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित चित्रांद्वारे आपली कलाकृती सादर केली. या स्पर्धेत एकूण 72 विद्यार्थ्यांमधून गट क्रमांक दोनमध्ये काव्यांजली पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. पूनम यांनी तिला प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले.
काव्यांजलीला या स्पर्धेसाठी वर्ग शिक्षिका पूनम निकम यांनी मार्गदर्शन केले. ती माध्यमिक शिक्षक व पक्षी अभ्यासक हेमराज पाटील यांची पुतणी असून चित्रकार अनिलराज पाटील यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल चोपडा येथील चित्रकला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी तिला रंगीत क्रेयान पेन्सिल बॉक्स भेट देऊन कौतुक केले. तसेच विवेकानंद विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते, उपमुख्याध्यापक श्री संजय सोनवणे, शिक्षकवृंद व संचालक मंडळाने काव्यांजलीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments