⏩ “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” – गोरगावले बुद्रुक तालुका चोपडा .. चोपडा प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्...
⏩ “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” – गोरगावले बुद्रुक तालुका चोपडा ..
चोपडा प्रतिनिधी:-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार, गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक ७ मार्च २०२६ रोजी येथे संपन्न झाले.
◾ शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ :
महसूल विभाग अंतर्गत डिजिटल सातबारा वाटप ११५, लागवडीखाली आणणे- ५६, जिवंत सातबारा अंतर्गत वारस नोंदी मंजूर करून सातबारा वितरण- ३६
▪️ पुरवठा शाखा – ११२ नवीन/दुबार शिधापत्रिका, डिजिटल शिधापत्रिका
▪️ संगायो शाखा – २३६ लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, ५६ हयात प्रमाणपत्रे,२२ नवीन अर्ज, ई केवायसी करणे - २१
▪️ सेतु शाखा – ३३५ उत्पन्न, ८५ राष्ट्रीयत्व, २२७ रहिवासी, ४२ जातीचे दाखले वाटप, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र - ६९, आधार नोंदणी- २८, आधार सुधारणा - ३४
▪️ पंचायत समिती – ५ जलतारा योजनेला प्रशासकीय मान्यता, जन्म व मृत्यू नोंद आदेश- ३०, मजुरांची ई केवायसी- ३५
▪️ बालविकास विभाग – ६ लाभार्थ्यांना बेबी कीट वाटप
▪️तालुका आरोग्य विभाग- जननी सुरक्षा योजना- ८ लाभार्थीना लाभ वाटप
▪️प्रधानमंत्री मातृ वंदना योजना- ६ लाभार्थीना लाभ वाटप
▪️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- १३ लाभार्थ्यांना लाभ
▪️संजय गांधी योजना- ३८ लाभार्थ्यांना लाभ
▪️कृषी विभाग- फळबाग लागवड योजना- ५ लाभार्थी
▪️गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना- 1 लाभार्थी, यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर हार्वेस्टर इत्यादी वाटप- १२
शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते.
➡️ एकूण १००० – ११०० नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली.
शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यात आली.
श्री. भाऊसाहेब थोरात तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
भूषण पाटील तलाठी लासुर यांनी सूत्रसंचालन केले व योगेश पाटील नायब तहसीलदार आभार मानले..







No comments