adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोळीबार करून पसार झालेला कुख्यात आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात..

  गोळीबार करून पसार झालेला कुख्यात आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.. अहिल्यानगर (प्रतिनिधी):- (संपादक :- हेमकांत गायकवाड) जामखेड...

 गोळीबार करून पसार झालेला कुख्यात आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात..




अहिल्यानगर (प्रतिनिधी):-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


जामखेड येथील न्यू कावेरी हॉटेलमध्ये झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याला अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.अनेक महिन्यांपासून फरार असलेला हा आरोपी खर्डा परिसरात आल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित अनिल पवार (वय 29, रा. कान्होपात्रानगर, जामखेड) हे 18 डिसेंबर 2025 रोजी बीड रोडवरील न्यू कावेरी हॉटेलमध्ये असताना आरोपी शुभम शहाराम लोखंडे,उल्हास विलास माने उर्फ वस्ताद,अक्षय उर्फ चिंग्या मोरे, अर्शद अमीन सय्यद तसेच 6 ते 7 अनोळखी साथीदारांनी एकत्र येत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.या वेळी आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार करून पवार यांना गंभीर जखमी केले.

याच वेळी हॉटेल मधील साहित्याची तोडफोड करण्यात आली तसेच एका फॉर्च्युनर गाडीवर सत्तूर आणि लाकडी दांड्याने हल्ला करून मोठे नुकसान करण्यात आले.या घटने प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 669/2025 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच आर्म ॲक्ट अंतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे हा घटनेनंतर फरार झाला होता. 6 मार्च 2026 रोजी तो खर्डा परिसरात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांना मिळाली.ही माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देताच त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्याचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ हरिष भोये,पोउपनि/ महादेव गुट्टे,समीर अभंग,पोलीस अंमलदार सुरेश माळी,फुरकान शेख, ह्रदय घोडके, अतुल लोटके, विष्णु भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, रिचर्ड गायकवाड, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,योगेश कर्डिले, अमृत आढाव,प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे,भगवान धुळे तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोउपनि/ किशोर गावडे, पुष्कर कडु, पोलीस अंमलदार प्रविण इंगळे, रविंद्र वाघ, देवीदास पळसे, कुलदीप घोळवे, दत्तात्रय बेल्हेकर, आकाश शेवाळे,प्रताप देवकाते,मनोज लातुरकर हे पथक तयार केले.आरोपीच्या हालचालींची माहिती घेत सापळा रचण्यात आला आणि कौशल्यपूर्ण कारवाई करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने चौकशीत 18 डिसेंबर 2025 रोजी साथीदारांसह पिस्तुलातून गोळीबार करून फिर्यादीला जखमी केल्याची तसेच हॉटेल व वाहनाची तोडफोड केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान अक्षय उर्फ चिंग्या मोरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात यापूर्वी खून,खुनाचा प्रयत्न,दरोडा, खंडणीसह विविध गंभीर गुन्ह्यांचे एकूण १० गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

सदर आरोपीला पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे..

No comments