रहिमतपूर पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन उत्साहांत संपन्न:- सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे! सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सातारा जिल...
रहिमतपूर पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन उत्साहांत संपन्न:- सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्हा पोलीस दलातील रहिमतपूर पोलिस ठाण्यात आज रोजी रहिमतपूर येथे सकाळी 11.45 ते 12.30 या वेळेत जागतिक महिला दिन 2026 निमिंत्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांत पोलिस ठाण्यातील महिला अंमलदार तसेच होमगार्ड पथकांतील महिला कर्मचारी व फॉरेन्सिक व्हॅनचे महिला अधिकारी यांचा पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान चिन्ह, बुके देवुन गौरव करण्यात आला. यावेळी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मनोगत वक्त केले व महिला दिनानिमिंत्त शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमांच्या शेवटी केक कापून महिला दिन उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रम हा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम उपविभागीय अधिकारी अधिकारी राजश्री तेरणी-पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे तसेच पोलीस ठाणेकडील अंमलदार पोलीस कर्मचारी वर्ग आदींची उपस्थिती होती.

No comments