महाराजस्व अभियानांतर्गत जागेवरच लाभार्थ्यांचे अडीअडचणींचे समाधान - प्रांताधिकारी बबनराव काकडे खिरोदा प्र महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महा...
महाराजस्व अभियानांतर्गत जागेवरच लाभार्थ्यांचे अडीअडचणींचे समाधान - प्रांताधिकारी बबनराव काकडे
खिरोदा प्र महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान
लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध झाला विविध योजनांचा लाभ
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शासनाच्या दिनांक 18-2-2026 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक 08-03-2026 रोजी मोजे खिरोदा प्र यावल महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (टप्पा 1) समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते, सदर शिबिरास तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. सर्व विभागाच्या अधिका-यांनी शासनाच्या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले सदर शिबिरास माननीय जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी श्री बबनराव काकडे उपविभागीय अधिकारी फैजपुर, तहसिलदार रावेर, नायब तहसिलदार, भारत बोंडे (सरपंच कुंभारखेडा), जाबरा तडवी (उपसभापती जि.प), नयना चौधरी (उपसरपंच), पुष्कर फेगडे (सरपंच रोझोदा), अलका बाळू महाजन (वाघोदा बु सरपंच), राहुल चौधरी (ग्राम. सदस्य खिरोदा प्र यावल,) जुम्मा तडवी (ग्राम सदस्य खिरोदा प्र यावल) ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर शिबीरास खिरोदा प्र यावल मंडळातील 435 लाभार्थी उपस्थित होते. सदर शिबीराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना खालील प्रमाणे विविध विभागाचे दाखले मंजूर करून शिबीरामध्येच वाटप करण्यात आले. सदर शिबिरास खालील प्रमाणे विभागनिहाय दाखले/सुविधा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. यासोबतच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून खिरोदा प्र यावल मंडळ भागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नारीशक्तीला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ :
प्रपत्र-१अ) अभियाना अंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या एकुण फेरफारांची संख्या-69
प्रपत्र-२अ) अभियानाअंतर्गत ७५/१२ मधील दुरुस्ती संदर्भात स्विकारण्यात आलेल्या अर्जाची संख्या-04
प्रपत्र-३अ) अभियाना अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या डिजीटल ७/१२ ची संख्या 1259
प्रपत्र-४अ) अभियाना अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या एकूण ८अ उता-पांची संख्या-1326
प्रपत्र-५अ) अभियानाअंतर्गत वितरीत करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या-226
प्रपत्र-६अ) अभियानाअंतर्गत एकखिड़की व्यवस्थे अंतर्गत (Single Window Clearence) निकाली काढण्यात आलेल्या एकुण अर्जाची संख्या - 19
प्रपत्र-७अ) अभियाना अंतर्गत भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या प्रकरणाची संख्या-0
प्रपत्र-८अ) अभियाना अंतर्गत अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या-0
सदर शिबिरास पाल मंडळातील एकुण 11 गावामधून एकूण 435 नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली. शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यात आली. सदर शिबिरास जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, मा. उपविभागीय अधिकारी श्री. बबनराव काकडे साहेब, तहसीलदार श्री संजय तायडे, नायब तहसीलदार श्री. आर. डी. पाटील, श्री.गणेश साळी, तालुका कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब वाळके, उपअधीक्षक भूमि अभिलेख शाखेचे रऊफ तडवी, तसेच इतर अधिकारी व चर नमूद केलेले पदाधिकारी व मोठया प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. सदर शिबिर शांतितेत पार पडले. गावपातळी शासनाच्या सेवा थेट मिळाल्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले व अशा शिबीरांची गावपातळीवर नियोजन व्हावे अशी नागरीकांची इच्छा व्यक्त केली.


No comments