adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईफिरता नारळी सप्ताहात पारायण कर्ते भाविकांना मिळणार ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज...

  मुक्ताईफिरता नारळी सप्ताहात पारायण कर्ते भाविकांना मिळणार ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज... इदू पिंजारी फैजपूर प्...

 मुक्ताईफिरता नारळी सप्ताहात पारायण कर्ते भाविकांना मिळणार ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज...




इदू पिंजारी फैजपूर प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


फैजपूर  सकल हिंदू समाज यावल व रावेर तालुका आयोजित आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताह मध्ये दररोज ज्ञानेश्वरी पारायण होणार असून  पारायण साठी सहभागी होणाऱ्या भाविकांना ज्ञानेश्वरी ग्रँथ भेट म्हणून देणार असल्याची माहिती  महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज यांनी आज फैजपूर येथे सप्ताह नियोजन बैठकीत दिली 

यासाठी सुमारे एक  हजार ज्ञानेश्वरी ग्रँथ  फैजपूर माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी हे ग्रँथ देणगी स्वरूपात देणार असल्याचे घोषित केले तर फैजपूर ग्रामस्थ कडून एक दिवस अन्नदानसेवा  वै विष्णू लालू नारखेडे  परिवार 51000 रु श्रीमद भागवत कथा समिती 51000 रु सतपंथ मंदिर 51000रु मुख्याधिकारी प्रशांत सरोदे 21000  विरोदा ग्रामस्थ 31000 रु  निलकंटेश्वर महिला मंडळ 11000 

श्रीराम मंदिर  विठ्ठल नामजप मंडळ 21000रु असा मदतीचा ओघ सुरू झाल्याची माहिती मनोगतात डिंगम्बर महाराज चिनावल कर मठ अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली  मानवी जीवन कल्याणकारी व तरुणाई सुसंस्कृत होण्यासाठी ज्ञानेश्वरी  चिंतना शिवाय पर्याय नाही सर्व तरुणाईने आवर्जून  या महोत्सवात ज्ञानेश्वरी चिंतन कथेस उपस्थित राहण्याचे आवाहन जनार्दन हरिजि महाराज यांनी केले कार्यक्रम 17 मार्च ते 24 मार्च  लोहारा चौफुली कुंभारखेडा येथे होणार असून गुरुवर्य महंत  रामगिरी महाराज  गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर एड जयवन्त महाराज बोधले वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष संदीपन महाराज शिंदे यांची विशेष उपस्थिती राहील अशी माहिती नरेंद्र नारखेडे यांनी दिली सभा लक्ष्मी स्वामील येथे संपन्न होऊन सभेस  निळकंठ सराफ किरण चौधरी 

माजी जि प सदस्य शरद महाजन   दूध संघ संचालक नितीन चौधरी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे  हेमराज चौधरी चोलदास पाटील    तसेच पवन सराफ सिद्धेश्वर वाघुळदे    नगर सेवक सूरज गाजरे राजू महाजन सागर होले अनंत नेहते संदीप भारंबे   नरेंद्र चौधरी चंद्रशेखर चौधरी अनिल नारखेडे सुनील नारखेडे मोहन लोखान्दे काशीनाथ वारके गणेश पाटील   अनिल पाटील कुंभारखेडा कार्यकर्ते सुनील चौधरी व सतीश चौधरी विरोदा योगेश तळेलेबामनोद सह भाविक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार नरेंद्र नारखेडे यांनी पार पाडले...

No comments