adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कासोदा येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” संपन्न...!

  कासोदा येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” संपन्न...!   कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी (सागर शेलार) (संपादक -:- हेमकांत ग...

 कासोदा येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” संपन्न...! 


 कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी (सागर शेलार)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार , गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक 07 मार्च रोजी कासोदा ता.एरंडोल येथे संपन्न झाले.

या शिबीराचे उद्घाटन उप जिल्हाधिकारी मंजुषा घाडगे, तहसीलदार , गोपाळ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी तहसीलदार, एरंडोल ,विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

◾ शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ :

▪️ पुरवठा शाखा –  56 अन्न सुरक्षा लाभ/नवीन/दुबार शिधापत्रिका

▪️ संगायो शाखा – 227 लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, 104 हयात प्रमाणपत्रे, 17 नवीन अर्ज

▪️ सेतु शाखा – 204 उत्पन्न, 107 राष्ट्रीयत्व, 155 रहिवासी, 91 जातीचे दाखले वाटप, 27 आधार नोंदणी, 57 यासुधारणा

▪️ पंचायत समिती – 3 जलतारा योजनेला प्रशासकीय मान्यता

▪️ बालविकास विभाग – 04 लाभार्थ्यांना बेबी कीट वाटप

▪️तालुका आरोग्य विभाग- जननी सुरक्षा योजना-07 लाभार्थीना लाभ वाटप

▪️प्रधानमंत्री मातृ वंदना योजना-06 लाभार्थीना लाभ वाटप 

▪️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- 06 लाभार्थ्यांना लाभ

▪️संजय गांधी योजना-30 लाभार्थ्यांना लाभ

▪️कृषी विभाग- फळबाग लागवड योजना- 3 लाभार्थी

▪️गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना- 2 लाभार्थी.

शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते.

➡️ एकूण 900–1000 नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली.

 शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यात आली.

उप जिल्हाधिकारी मंजुषा घाडगे , गोपाळ पाटील, तहसिलदार एरंडोल यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

अमोल बन नायब तहसीलदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच मंडल अधिकारी कासोदा भारत पारधी आणि मंडळामधील सर्व ग्रामस्थ, अधिकारी महसूल सेवक ,पोलीस पाटील सरपंच या सर्वांचे आभार व्यक्त केले.

No comments