adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

 महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार  पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्...

 महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार 


पल्लवी पाटील खामगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खामगाव : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे, नगरपरिषदेच्या नगररचना सहाय्यक नताशा वाणी, सामान्य रुग्णालयातील डॉ. वेदांती शिंगाडे, शिक्षिका सुनिता गौर, शहर पोलीस स्टेशनच्या सौ. कोल्हे तसेच सौ. कविता चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला संघटनेचे विदर्भ आरोग्य प्रमुख सुरज यादव, जिल्हाध्यक्ष राजेश घाटे, जिल्हा सल्लागार सिद्धेश्वर निर्मळ, शहराध्यक्ष अविनाश घोडके, उपाध्यक्ष रुपेश कलंत्री, सचिव गणेश भेरडे, कार्याध्यक्ष शे. बुडन कुरेशी तसेच डॉ. ऋषीकेश उन्हाळे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत समाजातील महिलांचे योगदान मोठे असल्याचे नमूद केले आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments