मुंबई महापालिका आयुक्तपदी सौ. अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची इंट्री! सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी प्रतिनिधी...
मुंबई महापालिका आयुक्तपदी सौ. अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची इंट्री!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावर कोणाची वर्णी लागणार चार दिवसांपूर्वी दोन बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ जी. शिंदे यांनी अखेर मुंबई महापालिका आयुक्त पदावर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामार्बत केला आहे. अश्विनी भिडे या लवकरच भूषण गागराणी आणि यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अश्विनी भिडे सन 1995 च्या तुकडीतील आयएस अधिकारी आहेत. मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत त्यांनी यापूर्वी मंत्रालयात विविध पदावर महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. मुंबई महापालिकेच्या दीडशे वर्षाहून अधिक काळाच्या इतिहासात या सर्वोच्च पदावर आता विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत भिडे यांच्या नावावर शिक्कामार्बत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंत्रालय कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या. दोन्ही मंत्र्यांचा भिडे यांच्यावर कार्यक्षमतेवर विश्वांस असल्याने आणि शहरांतील पायाभूत सुविधांची आव्हाने पाहता त्यांच्याकडे ही जबाबदारी संपूर्ण झाल्याचे समजत आहे. अश्विनी भिडे या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये त्यांच्या ठाम भूमिकेसाठी ओळखल्या जातात त्यांच्या अनेक कामाचे विशेष कौतुक होत आहे. अश्विनी भिडे यांच्याकडून आता मुंबई महापालिका आयुक्त पदावरही महत्वपूर्ण नागरिक पायाभूत सुविधा शहर प्रशासनाचे प्रकल्प हाताळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांचा पूर्ण कार्यकाळ हा 2030 पर्यंत अपेक्षित आहे.

No comments