adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मामलदे (ता. चोपडा) येथील घटनेबाबत अफवांना आळा – वन विभागाचे स्पष्टीकरण

 मामलदे (ता. चोपडा) येथील घटनेबाबत अफवांना आळा – वन विभागाचे स्पष्टीकरण  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्ह्यातील चोपड...

 मामलदे (ता. चोपडा) येथील घटनेबाबत अफवांना आळा – वन विभागाचे स्पष्टीकरण 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत सोशल मीडियावर आणि काही प्रसारमाध्यमांत “हिंस्त्र वन्य प्राण्याने बालिकेवर हल्ला केला” अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असल्याने वन विभागाने अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सखोल पाहणी करण्यात आली. या पाहणीत परिसरात कोणत्याही वन्य प्राण्याच्या हालचालीचे ठोस पुरावे, पावलांचे ठसे किंवा हल्ल्याचे संकेत आढळून आलेले नाहीत. तसेच भौगोलिक परिस्थिती व उपलब्ध पुराव्यांचा विचार करता, ही घटना वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत नाही.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेमार्फत सखोल तपास सुरू असून, आवश्यक नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घटनेमागील सत्य स्पष्ट होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या तपास प्रक्रियेत वन विभाग पूर्ण सहकार्य करत आहे. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अप्रमाणित किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. अशा अफवांमुळे अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण होऊन प्रशासनाच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच, नागरिकांनी संयम बाळगून अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments