कु. मोक्षदा दीपक महाजन महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव:- पं. नेहरू संस्कृती भ...
कु. मोक्षदा दीपक महाजन महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव:- पं. नेहरू संस्कृती भवन, पुणे येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात कु. मोक्षदा दीपक महाजन खामगाव यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. मेडिकल, इंजीनियरिंग, बँकिंग इत्यादींपेक्षा वेगळ्या क्षेत्राचा विचार करून मोक्षदाने वयाच्या बाराव्या वर्षापासून बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली व स्वतःच्या कर्तुत्वाने पुणे येथे इंडियन चेस क्लब या नावाने गेल्या सहा वर्षापासून कार्यरत असून बाणेर, सांघवी,रावेत, सौदागर ,वारजे,चिंचवड, पुनावळे, सूस अशा विविध भागात शाखा आहेत. तिने आफ्रिकेतील युगांडा येथे २०२४ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला बुद्धिबळाच्या सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ती बुद्धिबळ खेळाडू तर आहेच, त्यासोबतच बुद्धिबळ प्रशिक्षक , बुद्धिबळ टूर्नामेंट आयोजक व सिनियर नॅशनल अर्बिटर अशा विविध भूमिकांमधून तिने आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. वर्ल्ड चेस फेडरेशन अंतर्गत 'ऑटिस्टिक मुलांचा बुद्धिबळाच्या माध्यमातून विकास' या भारतातील पहिल्या प्रायोगिक उपक्रमाचे तिने नेतृत्व केले.ती ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये बुद्धिबळ जागृतीसाठी सदैव प्रयत्नरत असते. तसेच सामाजिक कार्यातही तिचा सहभाग आहे. तिच्या या क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी तिला 'आनंदी फाउंडेशन' या संस्थेने महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments