adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर मसाका ऊस उत्पादकांना मोठा दिलासा ; २३ हजार शेतकऱ्यांना ४ कोटींचा परतावा

 फैजपूर मसाका ऊस उत्पादकांना मोठा दिलासा ; २३ हजार शेतकऱ्यांना ४ कोटींचा परतावा  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथ...

 फैजपूर मसाका ऊस उत्पादकांना मोठा दिलासा ; २३ हजार शेतकऱ्यांना ४ कोटींचा परतावा 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथून जवळच असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखाना यावल व रावेर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, सन २०११ ते २०१६ या कालावधीत प्रति टन ५० रुपये दराने कपात करण्यात आलेली पूर्वहंगामी ठेव आता परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अंतर्गत सुमारे २३ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात ४ कोटी रुपयांचा परतावा मिळणार आहे. यासाठीचा प्रस्ताव पुणे येथील साखर आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

यावल येथील बाजार समितीत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत शासन व ऊस उत्पादक समन्वय समितीचे सदस्य नीलेश राणे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मधुकर सहकारी साखर कारखान्याकडून (मसाका) ऊस पुरवठा बिलातून प्रति टन ५० रुपये कपात करण्यात आली होती. ही रक्कम परत मिळावी यासाठी सन २०२२ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

दरम्यान, डिसेंबर २०२५ मध्ये साखर आयुक्त व संचालक (अर्थ), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत नीलेश राणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. समितीच्या ३० डिसेंबर २०२५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत द्वितीय लेख परीक्षक (वर्ग-१) यांच्या अहवालानुसार मसाकाकडे सुमारे ४ कोटी ३ लाख रुपये शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम शेतकऱ्यांना पूर्वहंगामी ठेव म्हणून परत देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे २३ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, संबंधित शेतकऱ्यांची यादी मसाकाचे कार्यकारी संचालक रत्नदीप वायकोळे यांच्याकडे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, मसाका विक्री व्यवहारासंदर्भात मुंबई न्यायालयात आव्हान देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

No comments