adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेला श्री बालाजी रथोत्सव गुरूवारी,खंडोबा महाराजांच्या १२ गाड्या देखील ओढल्या जाणार

 यावल येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेला श्री बालाजी रथोत्सव गुरूवारी,खंडोबा महाराजांच्या १२ गाड्या देखील ओढल्या जाणार  काल्पनिक फोटो  भरत कोळ...

 यावल येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेला श्री बालाजी रथोत्सव गुरूवारी,खंडोबा महाराजांच्या १२ गाड्या देखील ओढल्या जाणार 

काल्पनिक फोटो 

भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : शेकडो वर्षाची पंरपरा असलेल्या श्री बालाजी रथाेत्सव यावल शहरात गुरूवारी (दि.२) सांयकाळी साजरा केला जाणार आहे. सांयकाळी श्री महर्षी व्यास मंदिरासमोरील हडकाई- खडकाई नदी पात्रात रथाची शास्त्रोक्त पध्दतीने मान्यवरांच्या हस्ते पुजा करण्यात येईल व रथोत्सवाला सुरवात होईल. रात्रभर शहरातुन रथ मार्गस्त होत शुक्रवारी सकाळी समारोप होणार आहे.दरम्यान चोपडा रोडावरील बडगुजर समाजाच्या वतीने श्री खंडोबाची यात्रा निमित्त १२ गाड्या देखील ओढण्यात येणार आहेत. 

शहरात शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री बालाजी रथोत्सव गुरूवारी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात रथोत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक वर्ग उपस्थित राहतो. तर हडकाई नदी पात्रात यात्रा देखील भरते.एकी कडे या रथाचे पुजन करून महषी व्यास मंदिरा समोरील नदी पात्रातुन नगर पािलका मार्गे डांगपुरा मस्जिद जवळ रथ दाखल होतो. तर दुसरी कडे चोपडा रस्त्यावर असलेल्या राज्य विद्युत मंडळाच्या सबस्टेशन पासुन ते नदिच्या शहराकडे जाणाऱ्या मार्गा दरम्यान बारा गाड्या ओढण्यात येतात. बडगुजर समाजाच्या वतीने या गाडया ओढल्या जातात.यात देखील मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती राहते. बारा गाड्या ओढल्यानंतर रथ पुढे चावडी, मेनरोड, बोरावल गेट, देशमुख वाडा, लक्ष्मीनारायण मंदिरमार्गे, रेनुका देवीच्या मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे दाखल होईल व तेथे रथोत्सवाची सांगता होईल. या रथोत्सवाच्या मार्गाचे नगर परिषदेच्या वतीने डागडूजी देखील करण्यात येत आहे. गावात रथोत्सवानिमित्ताने डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त लावला जाणार आहे.

भाविक ओढतात रथ.

सुमारे १२ टन वजनाच्या या रथाला भाविकवर्ग ओढत असतो तर अतिशय शिताफीने रथाच्या चाकंाना मोगरी लावत कसबपुर्ण रित्या वळविण्यात येते व या रथा सोबत भालदार, चोपदार मंडळीं देखील असते. शहरात सर्वत्र रथाचे पुजन व स्वागत अनेक ठिकाणी केले जाते.रात्रभर शहरात भाविकांसाठी यांत्रेची मोठी पर्वणी असते. 

इतिहास.

माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांचे आजोबा कै. पांडूरंग धोंडू देशमुख व सहकार्यांनी सन १९१४ मध्ये रथोत्सव सुरू केला होता.त्या काळात श्री बालाजी महाराजांची प्रतिमा आरूळ असलेला रथ रामजी मिस्त्री विनामुल्य करून दिला होता. पुजारी म्हणुन वासुदेवबाबा बियाणी,राजाभाऊ नागराज, भैय्याजी अग्नीहोत्री नंतर १९७३ ते २००६ या काळात रमेशशास्त्री बियाणी,नारायणराव बियाणी, बलवंत जोशी व २००६ नंतर आजवर महेश बियाणी, राजु बियाणी व सुनिल जोशी पुजारी म्हणुन काम पाहतात.

चोख पोलिस बंदोबस्त.

बारागाड्या ओडतांना त्यांचा समारोप डांगपुरा येथे मस्जिद जवळ होतो तर वेगाने येणाऱ्या १२ गाड्या प्रसंगी मस्जिदीच्या भिंती पर्यन्त येतात तेव्हा या ठिकाणी अडचण होवु नये म्हणुन पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. 

No comments