adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आष्टीत अवैध धंद्यांना मोकळे रान ? संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

  आष्टीत अवैध धंद्यांना मोकळे रान ?  संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह  आष्टी (प्रतिनिधी): (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बीड जिल्ह्...

 आष्टीत अवैध धंद्यांना मोकळे रान ?  संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह 


आष्टी (प्रतिनिधी):

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बीड जिल्ह्यातील आष्टी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार सध्या कमालीचा चर्चेत आला असून, येथील संबंधित अधिकाऱ्यांचे राजरोसपणे सुरू असलेले आर्थिक व्यवहार सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे परिसरात अवैध दारू विक्रीला अक्षरशः पेव फुटल्याचे चित्र पाहायला मिळत असून, कर्तव्यापेक्षा ‘लक्ष्मी दर्शनालाच’ अधिक महत्त्व दिले जात असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

काय आहे नेमका प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी परिसरात अवैध हातभट्टी, बनावट विदेशी दारू विक्री तसेच नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या ढाब्यांवर कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकारी वसुलीत अधिक लक्ष देत असल्याचे आरोप आहेत. अनेक ठिकाणी उघडपणे नियम धाब्यावर बसवून दारू विक्री सुरू असतानाही उत्पादन शुल्क विभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

आर्थिक व्यवहारांचे ‘ओपन’ गुपित:

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांचे काही खासगी व्यक्तींशी अर्थपूर्ण संबंध असून, या मध्यस्थांमार्फत हॉटेल व्यावसायिक आणि अवैध विक्रेत्यांकडून दरमहा ठराविक रकमेची मागणी केली जाते. जे व्यावसायिक पैसे देण्यास नकार देतात, त्यांच्यावरच केवळ नावापुरती कारवाई केली जाते, तर ‘हप्ता’ देणाऱ्यांना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे प्रामाणिक व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

No comments