तब्बल ४ हजार किलो प्रतिबंधित मांगुर मासा एलसीबीच्या जाळ्यात...२९ लाखांचा मुद्देमाल जप्त.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
तब्बल ४ हजार किलो प्रतिबंधित मांगुर मासा एलसीबीच्या जाळ्यात...२९ लाखांचा मुद्देमाल जप्त..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश देताच स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत तब्बल २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले तब्बल ४ हजार किलो मांगुर मासे वाहतूक करणारा ट्रक पकडत चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.या कारवाईमुळे अवैध मासेमारी व वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.या पथकात पोउपनि/ दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख,फुरकान शेख,राहुल डोके,सुनिल मालणकर,प्रशांत राठोड,सतिष भवर,चालक उमाकांत गावडे, उत्तरेश्वर मोराळे यांचा समावेश होता.दि. ०३/०३/२०२६ रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत ट्रक क्रमांक WB25M5023 मध्ये प्रतिबंधित मांगुर मासे भरून नगर–मनमाड महामार्गावरील निमगाव बायपास चौकातून जाणार असल्याची माहिती मिळाली.तत्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोउपनि/सागर काळे व इतर अंमलदार यांच्या मदतीने सापळा रचून ट्रक ताब्यात घेण्यात आला.
ट्रकची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित मांगुर मासे आढळून आले. ताब्यातील इसमांनी आपली नावे
स्वपन नियम डे, वय ३६ वर्षे,रा. बामनगज थाना दत्तपुकुर जि. बाराशाद, पश्चिम बंगाल
मकबुल रौफ सरदार, वय ३१ वर्षे,रा.मसलंदापुर,निमतला तालुका गोवडमा जि.नॉर्थ २४ परगना,पश्चिम बंगाल
कुतुब आयुब मंडल, वय ३५ वर्षे, रा. मंदीया थाना बदुडीया जि. नॉर्थ २४ परगना, पश्चिम बंगाल
मृत्युंजय मुकुल विश्वास, वय २७ वर्षे, रा. हाबरा थाना हाबरा जि. नॉर्थ २४ परगना, पश्चिम बंगाल
अशी असल्याचे सांगितले. चौकशीत हे मासे पश्चिम बंगाल येथून ‘मिराज’ (पूर्ण नाव माहित नाही) याने भरून दिल्याचे व ते खोपोली, मुंबई येथे ‘भाई’ (पूर्ण नाव माहित नाही) याच्याकडे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यानंतर ट्रक शिर्डी पोलीस ठाण्यात आणून मत्सव्यवसाय विकास अधिकारी सौ.प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी प्रत्यक्ष तपासणी करून संबंधित मासे प्रतिबंधित मांगुर असल्याचा अभिप्राय दिला.
कारवाईदरम्यान ४,००,००० रुपये किमतीचे ४०० किलो प्रतिबंधित मांगुर मासे (अंदाजे एकूण ४ हजार किलो वाहतूक) व २५,००,००० रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २९,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेले प्रतिबंधित मासे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आले.
याप्रकरणी मत्सव्यवसाय विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाणे गु.र. नं. १६०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहे.

No comments