शासन आदेशांना केराची टोपली; सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार उघड! अधिकार नसताना A.C (वातानुकूलित) बसविले आणि वापर के...
शासन आदेशांना केराची टोपली; सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार उघड!
अधिकार नसताना A.C (वातानुकूलित) बसविले आणि वापर केल्याचा आरोप; अधीक्षक अभियंत्यांचे कडक चौकशी आदेश
जळगांव प्रतिनिधी :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
जळगाव : शासनाचे परिपत्रक व स्पष्ट शासन निर्णय धाब्यावर बसवून अधिकार नसताना A.C (वातानुकूलित) बसविले आणि वापर केल्याचा गंभीर प्रकार सार्वजनिक बांधकाम मंडळ,जळगाव यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने निदर्शनास आल्याने विभागात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी अधीक्षक अभियंता यांनी थेट चौकशीचे आदेश देत संबंधित कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारला आहे. तक्रारदार हेमकांत बळीराम गायकवाड यांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी लेखी तक्रार सादर करून काही अधिकाऱ्यांनी शासन नियमांचे उल्लंघन करत अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला होता. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ज्यांना अधिकार नाही त्यांनी A.C (वातानुकूलित) बसविले आणि वापर करत आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या गंभीर आरोपांची दखल घेत अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, जळगाव यांनी संबंधितांना तात्काळ चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच,चौकशीअंती करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले असून तक्रारदारासही माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या पारदर्शक व जबाबदार प्रशासनाच्या धोरणाला छेद देणाऱ्या या प्रकारामुळे विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आता चौकशी प्रक्रियेतून नेमके कोण दोषी ठरतात आणि त्यांच्यावर कितपत कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments