adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धुळे-नंदुरबार जिल्हा आढावा बैठक प्रहार जनशक्ती पक्षाची संपन्न..

  धुळे-नंदुरबार जिल्हा आढावा बैठक प्रहार जनशक्ती पक्षाची संपन्न.. धुळे (प्रतिनिधी) :- (संपादक :- हेमकांत गायकवाड)   प्रहार जनशक्ती पक्ष व प्...

 धुळे-नंदुरबार जिल्हा आढावा बैठक प्रहार जनशक्ती पक्षाची संपन्न..



धुळे (प्रतिनिधी) :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

 प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या वतीने दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी धुळे व नंदुरबार जिल्ह्यांची संयुक्त आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत संघटन बळकटीकरण व आगामी कार्ययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ही बैठक प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बललू जवंजाळ, अभियान प्रमुख महेश दादा बडे तसेच नाशिक विभाग निरीक्षक गणेश भाऊ निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक वाढ कशी करावी, कार्यकर्त्यांनी गावागावात पक्षाचे काम कसे वाढवावे तसेच दिव्यांग व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम कसे करावे यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी गाव पातळीवर संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच येणाऱ्या काळात सामाजिक प्रश्न, दिव्यांग हक्क आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष अधिक सक्रियपणे काम करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

बैठकीत धुळे जिल्हा प्रमुख अॅड वसंत आप्पा बोरसे प्रहार सेवक डॉ.प्रदीप पवार. प्रहार सेवक वसिम खाटीक

ज्ञानेश्वर पावरा.एकनात वाघ संतोष थोडात. धुळे सचिव सचिव भाऊ व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि सर्वांनी एकत्रितपणे पक्ष मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.

No comments