मुक्ताई पालखी सोहळ्याचे उद्या फैजपूरात होणार आगमन स्वागताची जय्यत तयारी नरेंद्रभाऊ नारखेडे यांची माहिती इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- ...
मुक्ताई पालखी सोहळ्याचे उद्या फैजपूरात होणार आगमन स्वागताची जय्यत तयारी नरेंद्रभाऊ नारखेडे यांची माहिती
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर यावर्षीचा मुक्ताई फिरता नारळी सप्ताह चे यजमान पद सेवा यावल व रावेर तालुकयास मिळाले आहे या महोत्सवाचे नियोजन महामंडलेश्वर जनार्धन हरिजि महाराज व रवींद्र हरणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून यानिमित्ताने आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे आगमन फैजपूर शहरात 16 मार्च ला सकाळी 10 वा सुभाषचौक येथे होणार असल्याची माहिती डिंगम्बर महाराज चिनवलकर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली
पालखी सोहळा खुशाल भाऊ रोडने श्रीराम मंदिर व पुढे विठ्ठल मंदिर येथे पालखी थांबणार असून भाविकांनी विठ्ठल मंदिर जवळ दर्शनास यावे व दिंडी मार्गावर स्वच्छता रांगोळी पुष्यवृष्टी गुढी उभारणे तयारी नागरिक करीत आहे हा ऐतिहासिक सोहळा प्रथमच फैजपूर येथे येत असल्याने भाविकांचे मनात उत्साह निर्माण झाला आहे
सतपंथ मंदिर महानुभाव मंदिर स्वामींनारायन मंदिर खंडोबा मंदिर गणपती वाडी मंदिर सर्व देवी मंदिर गणेश मंडळ दूरगोत्सव मंडळ खुशाल महाराज रथोत्सव मंडळ इस्कॉन मंदिर प्रजापिता ब्रह्मकुमारी दादाजी धुनिवले संत गजानन महाराज भक्त परिवार साई भक्त परिवार
स्वामीसमर्थ सेवा भक्तपरीवार महिला भजनी मंडळ सह सकल हिंदू समाज आध्यत्मिक परंपरा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित राहणार आहे
उपस्थिती चे आवाहन महामंडलेश्वर जनार्धन हरिजि महाराज व श्रीमद भागवत कथा समिती फैजपूर व ग्रामस्थांनी केले आहे

No comments