adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिरपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘नारी शक्ती’चा सन्मान

 शिरपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘नारी शक्ती’चा सन्मान  शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिरपूर : जागतिक महिला दिनानिमित्त...

 शिरपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘नारी शक्ती’चा सन्मान 


शिरपूर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिरपूर : जागतिक महिला दिनानिमित्त शिरपूर शहरातील कै. शंकरनाना लान्स येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ व जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. वैशाली निकम, महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हाध्यक्षा सौ. हेमलता येशी, माजी नगरसेविका मनिषा सोनगडे, जिल्हा उपाध्यक्षा पल्लवी शिरसाठ, उत्तर महाराष्ट्र संघटिका रंजना सूर्यवंशी, डॉ. नम्रता येशी, जिल्हा कार्याध्यक्षा अनिता पवार, जिल्हा संघटिका सुनंदा खोंडे, तालुका कार्याध्यक्षा विमल येशी व तालुका अध्यक्षा कांचन निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या संघर्षशील महिलांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. महिलांच्या आनंदात भर घालण्यासाठी खानदेशातील प्रसिद्ध एकपात्री विनोदी प्रयोग सादर करणारे प्रवीण माळी यांनी आपला विशेष विनोदी प्रयोग सादर केला. या हास्यविनोदी सादरीकरणाचा कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माता-भगिनी व नागरिकांनी भरभरून आनंद घेतला. महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तसेच रामविकास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी शिरसाठ यांनी केले, प्रास्ताविक कांचन निंबाळकर यांनी मांडले तर आभार प्रदर्शन रंजना सूर्यवंशी यांनी केले.

No comments