adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हद्दपारीचा आदेश धुडकावला… घरातच लपला आरोपी.. एमआयडीसी पोलिसांचा धाडसी सापळा आणि आरोपी थेट अटक..!

  हद्दपारीचा आदेश धुडकावला… घरातच लपला आरोपी.. एमआयडीसी पोलिसांचा धाडसी सापळा आणि आरोपी थेट अटक..! अहिल्यानगर (प्रतिनिधी):- (संपादक :- हेमका...

 हद्दपारीचा आदेश धुडकावला… घरातच लपला आरोपी.. एमआयडीसी पोलिसांचा धाडसी सापळा आणि आरोपी थेट अटक..!



अहिल्यानगर (प्रतिनिधी):-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार परवानगी शिवाय पुन्हा जिल्ह्यात वावरत असल्याची गुप्त माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचत धाडसी कारवाई करत मुनाफ चांद शेख (वय ४५,रा.जेऊर बायजाबाई, ता.जि.अहिल्यानगर) याला अटक केली.हद्दपारीचा आदेश मोडून तो आपल्या राहत्या घरी आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत मुनाफ चांद शेख याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.मात्र हा आदेश धुडकावून तो परवानगी न घेता पुन्हा जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.त्यानंतर सपोनि माणिक चौधरी यांनी पोलीस पथक तयार करून पोहेकॉ.राजू सुद्रिक, पोकॉ.दीपक फुंदे व चापोकॉ. राहुल ढाकणे यांना कारवाईचे आदेश दिले.पोलिसांनी ५ मार्च २०२६ रोजी छापा टाकत मुनाफ चांद शेख याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.या प्रकरणी पोकॉ.दीपक रामदास फुंदे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १७१/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १४२ नुसार पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान,मुनाफ चांद शेख याच्यावर यापूर्वीही एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.माणिक बी.चौधरी व त्यांच्या पथकाने केली.

No comments