हिंदु नववर्ष गुढीपाडवा निमित्त मलकापूर शहरातून निघाली भव्य महिला मोटरसायकल रॅली 🚩 अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकाप...
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- दरवर्षी प्रमाणे नववर्षाच्या स्वागतासाठी महिला रॅली चे आयोजन केले जातं असते. यावेळी या रॅली ने भव्य असे स्वरूप घेतले. मुली व महिला मोठ्या संख्येत सांस्कृतिक वेशभुषेत सहभागी झाल्या होत्या. सकाळी गुढीपूजन ध्वज पूजन करून रॅली ला सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगरसंघचालक दामोरदरजी लखानी. सह संघचालक राजेशजी महाजन. मलकापूर विधानसभेचे माननीय आमदार चैनसुखजी संचेती हे आवर्जून उपस्तित होते. रॅली नंतर भव्य बक्षीस वितरण करण्यात आले यात 51 पैठणीचा लकी ड्रॉ, 11 महिलांना विशेष पारंपारीक वेशभूषा बद्दल पुरस्कार देण्यात आला.
सजावट करून आलेल्या लहान मुलींना सुद्धा यावेळी बक्षीस व पैठणी देण्यात आले. बक्षीस वितरनाला विश्वकर्मा ऍग्रो इंजिनीरिंग वर्क चे संचालक सचिन भाऊ चव्हाण, डॉक्टर पुनमजी बाहेती, आकाशजी दोशी डॉक्टर दोशी मॅडम रील्स स्टार तन्वी ताई ओगले काका असे सर्व मान्यवर उपस्तित होते. सर्वांच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाच्या मदतीने संपूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला. श्रीराम बहुउद्देशीय संस्था व श्रीराम ढोल पथकाचे सदस्य यांनी सर्व आयोजन पार पाडले. भव्य रॅली मुळे मलकापूरच्या महिला वर्गामधे जोश उत्साह पाहायला मिळाला. महिला शक्तीला वर्षातून एकदा मिळणाऱ्या संधी मुळे सर्वांनी आयोजकांचे आभार मानले. यापेक्ष चांगले आयोजन दरवर्षी करण्यात येईल. अश्या माध्यमातून महिलांना सार्वजनिक व सांस्कृतीक कार्यक्रमान मधे सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नेहमी केला जाणार आहे..

No comments