adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ईद निमित्त बाजारात उत्साहाचे वातावरण खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली ! सुकामेव्याच्या दरात २०% वाढ झाल्याने कही खुशी कही गम!

  ईद निमित्त बाजारात उत्साहाचे वातावरण  खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली ! सुकामेव्याच्या दरात २०% वाढ झाल्याने कही खुशी कही गम!  रावेर प्रत...

 ईद निमित्त बाजारात उत्साहाचे वातावरण  खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली ! सुकामेव्याच्या दरात २०% वाढ झाल्याने कही खुशी कही गम! 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रमजानचा पवित्र महिना आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि ईद-उल-फित्रच्या आगमनाने बाजार चैतन्यमय होत आहेत. चंद्रदर्शनानंतर २१ मार्च रोजी ईदची नमाज अदा होण्याची शक्यता आहे?. सण जवळ येत असल्याने बाजारातील खरेदीदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये, विशेषतः कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. लोक स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी नवीन कपड्यांच्या खरेदीत व्यस्त आहेत. संपूर्ण बाजारपेठेत उत्सवाचे वातावरण आहे आणि दुकाने आकर्षकपणे सजवलेली आहेत. महिला खरेदीदारांमध्ये सर्वाधिक दिसत असून, त्या कपडे, बूट, सौंदर्यप्रसाधने आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यात व्यस्त आहेत. आजकाल शिंप्यांवरही कामाचा वाढता ताण आहे. लोक शक्य तितक्या लवकर कपडे खरेदी करून शिवण्यासाठी देत ​​आहेत, जेणेकरून त्यांचे कपडे ईदपूर्वी तयार होतील. 


तयार कपड्यांच्या दुकानांमध्ये लहान मुलांच्या कपड्यांचीही चांगली विक्री होत आहे. सौंदर्यप्रसाधने आणि बांगड्यांच्या दुकानांमध्येही ग्राहकांची चांगली गर्दी दिसून येत आहे. बाजारात विविध रंगांच्या आणि डिझाइनच्या बांगड्या महिलांना आकर्षित करत आहेत.

ईदचा विशेष पदार्थ असलेल्या शेवयांची विक्री सध्या मर्यादित आहे, परंतु दुकानदारांच्या मते ईदच्या तीन-चार दिवस आधी त्याची मागणी झपाट्याने वाढते. सध्या बाजारात लच्छा शेवया आणि फालुदा विकणारी दुकाने दिसू लागली आहेत. 


दुकानदारांचे म्हणणे आहे की, जसजशी ईद जवळ येईल, तसतशी बाजारांची शोभा वाढेल आणि चंद्राच्या रात्रीपर्यंत बाजारपेठा गजबजलेल्या राहतील. परंतु वाढती महागाई आणि सुका मेवा, नारळ, मनुका, काजू, बदाम, पिस्ता, खजूर, मावा, तूप, तेल यांसारख्या वस्तूंच्या किमतीत २०% वाढ होत वस्तूंच्या दरवाढीमुळे झाल्यामुळे शिरखुरमा शिवैय्यांचा गोडवा कमी होत असल्याचे दिसत आहे आणि खरेदीदारांमध्ये ...कही खुशी कही गम! संमिश्र चित्र दिसून येत आहे. तरीही, शहरवासीयांमध्ये ईदबद्दल खूप उत्साह दिसून येत आहे.

No comments