adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ममता पाटील यांना दामिनी राष्ट्रीय पुरस्कार २०२६ प्रदान

  ममता पाटील यांना दामिनी राष्ट्रीय पुरस्कार २०२६ प्रदान इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी  येथील मूळ रहिवासी व महाराष...

 ममता पाटील यांना दामिनी राष्ट्रीय पुरस्कार २०२६ प्रदान


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

न्हावी  येथील मूळ रहिवासी व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विभाग मुंबई या विभागाचे राज्यमंत्री रवींद्र साठे यांच्या स्वीय सहायक म्हणून कार्यरत असलेल्या सौ. ममता यशवंत पाटील ( ह.मु.तारापूर, जि- पालघर ) यांनी केलेल्या उद्योग व सामाजिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना

  जागतिक महिला दिनानिमित्त दामिनी राष्ट्रीय पुरस्कार- २०२६ आज रोटरी क्लब सभागृह, शालिमार, नाशिक येथे प्रदान करण्यात आला. सौ ममता पाटील यांना हा पुरस्कार मिसेस इंडिया तसेच मिसेस इंटरनॅशनल दुबई- अश्विनी अत्रे- दीक्षित यांच्या हस्ते  देण्यात आला. प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सुदाम पाटील, प्रा. एन टी तळेले, प्रा.आर वाय पाटील, अनिल लढे,प्रा.एल डी चौधरी,प्रा. देवेंद्र पाचपांडे, किशोर झोपे, युवराज वाघुळदे, प्रमोद चौधरी, यशवंत पाटील, ललित कुमार  फिरके यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.

No comments