adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईचे नामघोषात झाले फिरता नारळी सप्ताहाचे ध्वजारोहण..

  मुक्ताईचे नामघोषात झाले फिरता नारळी सप्ताहाचे ध्वजारोहण.. इदू पिंजारी फैजपूर प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) फैजपूर। सकल हिंदू समा...

 मुक्ताईचे नामघोषात झाले फिरता नारळी सप्ताहाचे ध्वजारोहण..





इदू पिंजारी फैजपूर प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


फैजपूर। सकल हिंदू समाज यावल व रावेर तालुक्याने आयोजित केलेल्या आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहाचे विधिवत ध्वजारोहण महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज  मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे मुक्ताई संस्थान अध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांचे हस्ते पार पडले 

कार्यक्रमास माजी आमदार अरुण पाटील धनंजय चौधरी शरद महाजन नरेंद्र नारखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती  तरुणाई ला परिवर्तन करण्याची ताकद ज्ञानेश्वरी चितन कथेत असून मानवी जीवनातील गुन्हेगारी वृत्ती नायनाट होण्याची शक्ती ज्ञानेश्वरी कथा श्रावणात असल्याने तरुणाई ने हजरोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन याप्रसंगी जनार्धन महाराज यांनी केले मुक्ताई चे आपणावर फार मोठी कृपा आहे व यातून उतराई होण्याची वेळ या महोत्सवात आहे सर्वरवींद्र भाविकांनी तन मन धन सह सहभागी व्हावे अशी विनंती रविंद्र महाराज हरणे यांनी मनोगतात व्यक्त केली  मुक्ताई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी भव्य दिव्य आयोजन व तयारी याबाबत अभिनंदन करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य राहील याबाबत सविस्तर माहिती दिली धनंजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन बाबत आढावा डिंगम्बर महाराज चिनावकर वारकरी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी मांडला  सुमारे 20 एकर क्षेत्रात महोत्सवाची तयारीला वेग आला आहे   दररोज ज्ञानेश्ववरी पारायण व चिंतन कथा व सकाळी व रात्री कीर्तनाचे भरगच्च कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास रमेश महाजन विजय महाजन मिलिंद वायकोळे रोझोदा घनश्याम पाटील संजीव महाजन दामोदर महाजन विठ्ठल भंगाळे सुनील भंगाळे चिनावल राजुभाऊ नाचनखेडे उद्धव महाराज जुणारे दुर्गादास महाराज नेहते दत्तात्रय महाराज गुरव कुंभारखेडा पदाधिकारी व कार्यकर्ते मुकेश पाटील उमाकांत पाटील अनिल नारखेडे किरण चौधरी शेखर चौधरी भूषण नारखेडे  दूध संघ संचालक नितीन चौधरी गम्भीर चौधरी सर  यासह शेकडो भाविक उपस्थित होते..

No comments