adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सोनवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या टप्पा 1 ला सुरुवात मा. ना. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व जिल्हाधिकारी मा. श्री रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान संपन्न..

  सोनवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या टप्पा 1 ला सुरुवात मा. ना. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व जिल्हाधिकारी मा. श्री रोहन...

 सोनवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या टप्पा 1 ला सुरुवात मा. ना. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व जिल्हाधिकारी मा. श्री रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान संपन्न..




विकास पाटील धरणगाव प्रतिनिधी : -

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


महसूल व वन विभाग यांच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णय नुसार क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता,शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे शासनाच्या विविध विभाग यांच्याशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्या बाबत करणेबाबत निर्देश दिले आहेत.

      त्या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील सोनवद मंडळात प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद बु येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजेपासून राबविण्यात आले. यावेळी मा.ना.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मा जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे यांचे प्रमुख उपस्थितीत विविध शासकीय योजनांचे प्रत्यक्ष वाटप होऊन उपस्थीत नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले.


 या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर वाटप झाले यात 

जात प्रमाणपत्र - 144, 

राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र-118,

नवीन रेशन कार्ड - 27, 

संजय गांधी योजना मंजूर प्रकरणे-28,

वारस फेरफार-42,

कालबाह्य नोंदी कमी करणे-630,

आयुष्मान भारत कार्ड - 09, 

घरकुल लाभार्थी नमुना ८ - 18, 

कृषी विभागांतर्गत कांदा चाळ पूर्वसमती-2,

पॅक हाऊस पूर्व संमती-1,

शेत तळे पूर्व संमती-1, 

भूमी अभिलेख विभाग अंतर्गत एकूण 8 गावाच्या 2840 ड्रोन सर्वे सनद वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले. या अभियानामुळे धरणगाव तालुक्यातील शेतकरी, महिलावर्ग, दिव्यांग व दुर्बल घटक यांना थेट न्याय मिळाला असून, सेवा पंधरवड्यातील हे वाटप शासन-जनता दुवा ठरल्याचे समाधान लाभार्थ्यांनी व्यक्त करत होते.

 सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे,उपविभागीय अधिकारी एरंडोल श्री मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार श्री महेंद्र सूर्यवंशी ,तालुका कृषी अधिकारी श्री देसाई,श्री वाघ ,उप अधीक्षक भूमी अभिलेख,श्रीमती रेखा तायडे ,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व ईतर विभाग यांचे अधिकारी तसेच उज्ज्वला पाटील सरपंच सोनवड बु. प्रेमराज पाटील, दिलीप अण्णा धनगर, निर्दोष पवार, चंद्रशेखर भाटिया दामू पाटील, रवींद्र हरणे पो. पा तसेच इतर पदाधिकारी लाभार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

No comments