adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सप्तशृंगी देवी पायी वारीदरम्यान तरुणाचा मृत्यू; चौगाव गावावर शोककळा

सप्तशृंगी देवी पायी वारीदरम्यान तरुणाचा मृत्यू; चौगाव गावावर शोककळा  नाशिक प्रतिनिधी / विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कळवण ...

सप्तशृंगी देवी पायी वारीदरम्यान तरुणाचा मृत्यू; चौगाव गावावर शोककळा 


नाशिक प्रतिनिधी / विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कळवण (जि. नाशिक) : सप्तशृंगी देवी गडावर पायी वारीसाठी निघालेल्या १७ वर्षीय तरुणाचा भंडारा कार्यक्रमादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे चौगाव गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कळवण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परेश धर्मा पवार (वय १७, रा. चौगाव, ता. चोपडा, जि. जळगाव) हा तरुण चौगाव येथून सप्तशृंगी देवी गड येथे पायी वारीसाठी निघाला होता. दरम्यान, नव्याने मेढे (ता. कळवण, जि. नाशिक) येथे आयोजित भंडारा कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता जेवणासाठी रांगेत उभा असताना त्याला अचानक चक्कर येऊन तो खाली कोसळला. उपस्थितांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १७/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद केली आहे.
सदर प्रकरणी दाखल अंमलदार पोहवा. जे. ए. सोळंखे (कळवण पोलीस स्टेशन) यांनी नोंद केली असून, तपासी अंमलदार पोहवा. आर. पी. गवळी (कळवण पोलीस स्टेशन) पुढील तपास करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी अधिक चौकशी सुरू आहे.

No comments