adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना निवेदन; ज्ञानेश्वर पावरा यांच्या पुढाकाराचे कौतुक

 संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना निवेदन; ज्ञानेश्वर पावरा यांच्या पुढाकाराचे कौतुक  शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- ह...

 संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना निवेदन; ज्ञानेश्वर पावरा यांच्या पुढाकाराचे कौतुक 


शिरपूर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धुळे : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना (NGP5768) च्या वतीने संगणक परिचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

शिरपूर तालुक्यातील प्रहार सेवक वसीम हुमायून खाटीक आणि ज्ञानेश्वर लालचंद पावरा यांनी पुढाकार घेत हा निवेदनाचा उपक्रम राबवला. संगणक परिचालकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

या वेळी ज्ञानेश्वर पावरा यांनी दाखवलेली तत्परता आणि सक्रियता कौतुकास्पद असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. आपल्या न्याय्य हक्कांसाठी प्रत्येक संगणक परिचालकाने अशाच प्रकारे लोकप्रतिनिधींपर्यंत आपले प्रश्न पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले.

संघटनेच्या वतीने ज्ञानेश्वर पावरा यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या कार्याचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, सर्व संगणक परिचालकांनी एकजुटीने लढा दिल्यास हा संघर्ष निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“एकच जिद्द, परिचालक कायम व्हावेत!”

“परिचालक एकता झिंदाबाद!”

— महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना 

No comments