मोठा वाघोदा बुद्रुक येथील नवीन ईदगाह कामाचे भूमिपूजन बाळापूर चे पीर साहेब हुजूर जकीमियां नक्षबंदी यांच्या हस्ते झाले भुमि पूजन! रावेर प्र...
मोठा वाघोदा बुद्रुक येथील नवीन ईदगाह कामाचे भूमिपूजन
बाळापूर चे पीर साहेब हुजूर जकीमियां नक्षबंदी यांच्या हस्ते झाले भुमि पूजन!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील मुस्लिम समाज रमजान ईद,ईद दुल अजहा बकरा ईद,ईद मिलाद्दुनबी ची नमाज अदा करीत असलेल्या शेकडो वर्षांपासून असलेला मात्र जीर्ण झालेल्या परिस्थितीत असलेला ईदगाह स्थान मोठा वाघोदा येथील मुस्लिम समाज बांधवांनी नूतन बांधकाम करण्यासाठी रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम समाज बांधवांकडून देणगी चंदा जमा करून या ईदगाह वस्तूची नवीन उभारणी करावी या उद्देशाने दानशूर देणगीदारांकडून जामा मस्जिद चे ईमाम मौलाना अली कादरी यांनी आवाहन केले त्या आवाहनाला समाज बांधवांनी प्रतिसाद देत आज शुक्रवार म्हणजेच जुम्माच्या नमाज पठण नंतर विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील खानकाह चे पिरे तरीकत पीर साहब हुजूर जकिमिया नक्षबंदी यांच्या हस्ते समाज बांधवांच्या उपस्थितीत आज कुदळ मारून या नवीन ईदगाह वस्तू कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या इदगाह शरीफचे उद्घाटन हुजूर कायद-ए-बरार, सय्यद झकी मिया नक्शबंदी साहाब (बालापूर) यांच्या शुभहस्ते चिन्हांकित करण्यात आले. यावेळी मौलाना हसरत अली कादरी जामा मशिदीचे इमाम उपस्थित होते. मुतवल्ली शेख जब्बार, शेख उस्मान, सय्यद नाझीम, सय्यद किफायत, शेख फरीद, शेख हमीद, इक्बाल खान, उस्मान खान, आदिंसह मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते



No comments