खामगाव येथे श्री हिंगलाज माता प्रगटदिनानिमित्त शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन! पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव शह...
खामगाव येथे श्री हिंगलाज माता प्रगटदिनानिमित्त शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन!
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव शहरातील दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हिंगलाज माताचा प्रगटदिन उत्साहात साजरा करण्यात आला असून, रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भावसार समाज युवक मंडळ, समस्त खामगाव भावसार समाज मंडळ तसेच श्री हिंगलाज माता उत्सव समिती, खामगाव यांच्या वतीने करण्यात आले . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माझी जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. तसेच महिला जिल्हाध्यक्ष सौ चेतना गजानन खेते उपस्थित होत्या. हिंगलाज मातेची आरती व पूजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सौ. चेतना गजानन खेते यांनी आपले मनोगत व्यक्त केले समाजाबद्दल आभार व्यक्त केले. समाजाची अशीच प्रगती होत राहो सर्वांनी एकोप्याने आपल्या समाजाचा विकास करावा , असे आवाहन करण्यात आले.
भावसार समाजाचे युवा नेतृत्व श्री अमोल अंधारे यांनी सुद्धा जनतेला आव्हान केले. सर्वांनी आपले मनोगत थोडक्यात मांडले. शोभायात्रा दुपारी ४.३० वाजता भावसार पंच बंगला येथून सुरू केली असून, अर्जुनजल मंदिर, भुताळ चौक, सतीफेल, रेखा प्लॉट, सिंधी कॉलनी, नवीन भावसार भवन मार्गे गुढा ले-आऊट, तलाव रोड असा मार्गक्रमण करत खामगाव येथे समाप्त झाला. शोभायात्रेनंतर गुढा ले-आऊट येथील भावसार भवन येथे श्री हिंगलाज माताची आरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाप्रसादाचा वेळ रात्री ७ ते १० असा ठेवण्यात आला. तरी सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. खामगाव समाजातील कार्यकारिणी ने उत्कृष्ट प्रकारे आपले कामगिरी बजावली.


No comments