सातारा जिल्ह्यात एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू राहणार; इंधन टंचाई नसल्याची प्रशासनाची माहिती प्रवाशांना दिलासा :- विभागीय नियंत्रक ज्योती गायकव...
सातारा जिल्ह्यात एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू राहणार; इंधन टंचाई नसल्याची प्रशासनाची माहिती प्रवाशांना दिलासा :- विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड
सातारा जिल्हा संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र ग्रामीण वाहतुकीचा कणा असलेल्या लालपरीची सेवा सुरळीतपणे सुरू असून नियोजित वेळेनुसार एसटीच्या फेऱ्या सुरू राहणार असल्याची माहिती सातारा जिल्हा एसटी विभागीय नियंत्रक प्रमुख ज्योती गायकवाड यांनी प्रसार माध्यमांतून दिली आहे. इंधन टंचाईच्या अफवांमुळे अनेक वाहन चालकांनी घाबरून पेट्रोल पंपावर धाव घेतल्याने काही ठिकाणी पंपावर गर्दी झाली आहे. परिणामी काही पंपावर इंधन संपल्याचेही प्रकार घडत आहेत. यामध्ये इंधन टंचाईच्या अफवांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था झाली होती. अनेकांनी फेऱ्या रद्द होण्याच्या भीतीने एसटीने प्रवाशाची जास्ती घेतली होती. या चुकीच्या अफंवामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या स्थितीत एसटी महामंडळाच्या कुठल्याही पंपावर इंधन टंचाई नसून या चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट करत एसटी प्रवाशांना दिलासा दिला आहे. एसटी महामंडळाच्या पेट्रोल पंपावर कोणते इंधन टंचाई नसून एसटी बससाठी आवश्यक इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवचनसाठी एसटी सेवा खंडितपणे सुरू असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील सर्व फेऱ्या सुरू राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा एसटी विभागीय नियंत्रक प्रमुख ज्योती गायकवाड यांनी दिली आहे.

No comments