adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची 8 महिन्यांत तडकाफडकी बदली;पिंपरी-चिंचवड च्या पोलीस आयुक्तांना मॅट कोर्टाचा दणका!

  कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची 8 महिन्यांत तडकाफडकी बदली;पिंपरी-चिंचवड च्या पोलीस आयुक्तांना मॅट कोर्टाचा दणका!   संभाजी प...

 कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची 8 महिन्यांत तडकाफडकी बदली;पिंपरी-चिंचवड च्या पोलीस आयुक्तांना मॅट कोर्टाचा दणका!  


संभाजी पुरीगोसावी ( मुंबई ) प्रतिनिधी. 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


मुंबई – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतील वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची केवळ 8 महिन्यांत अचानक तडकाफडकी बदली करण्यात आल्याने प्रशासकीय वाद चांगलाच निर्माण झाला असून. त्यांच्या विरोधात कोणतीही कायदा व सुव्यवस्था संबंधित तक्रार, जनतेचे अर्ज किंवा राजकीय तक्रार नसताना ही बदली करण्यात आली याबाबत  सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्यांचे पोलीस महासंचालक यांनी सर्वसाधारण बदल्या होईपर्यंत इतर कोणत्याही बदल्या करू नयेत असा लेखी आदेश असतानाही पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ही बदली केल्याचा आरोप पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडून मॅट कोर्टात दाखल  करण्यात आला होता.  अन्यायकारक बदलीविरोधात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी आता आपल्या अचानक झालेल्या बदलीबाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT), मुंबई येथे दाद मागितली.

      दि. 24 मार्च 2026 रोजी झालेल्या सुनावणीत माननीय न्यायाधीश चक्रवर्ती यांनी पोलीस आयुक्तांकडे माळी यांच्या बदलीचे कारण विचारले असता. मात्र त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार किंवा कसूर दर्शवणारी कागदपत्रे सादर करण्यात आयुक्तालय अपयशी ठरले. यावर न्यायालयाने ही नाराजी व्यक्त करत दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून 7 एप्रिल 2026 ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

तसेच, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, बॉम्बे हायकोर्ट, MAT आणि पोलीस महासंचालक यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात मुदत पूर्ण होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

माहितीनुसार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा कार्यकाळ 2024 मध्ये पूर्ण झाला असून, बदलीची शक्यता लक्षात घेता त्यांनी सुमारे 50 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या संशयास्पद बदल्या केल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. याबाबतही न्यायालयाने माहिती सविस्तर मागवली आहे. ती माहिती प्राप्त करण्याकरिता अॅड  प्रशांत नागरजोगे यांनी मा पोलीस आयुक्त यांचेशी पत्रव्यवहार केला असुन  आयुक्तलायाचे अडचणीत वाढ झाली आहे.

मा.कोर्टाने हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात असून, 2024 मध्ये मुदत पूर्ण झाल्यानंतरही आयुक्तांची बदली न होणे आणि इतर अधिकाऱ्यांच्या मुदतीपूर्वी बदल्या करणे यावर मा. कोर्टात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 या प्रकरणात शत्रुघ्न माळी यांच्या वतीने अॅड. प्रशांत नागरजोगे कामकाज पाहत आहेत. दि. 7 एप्रिल 2026 रोजी MAT कोर्ट काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचे लक्ष लागून आहे.. 

No comments