adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाची ओम मल्टिपेक्स इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट

 श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाची ओम मल्टिपेक्स इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट  प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -...

 श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाची ओम मल्टिपेक्स इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट 


प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर:-  मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय येथील रसायनशास्त्र विभागामार्फत पदव्युत्तर (PG) व पदवी (UG) विद्यार्थ्यांसाठी दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी Om Multipex Industries, किन्ही MIDC, भुसावळ येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. उद्योग व महाविद्यालय यांच्या समन्वयातून आयोजित या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रिया, कच्चामाल हाताळणी, गुणवत्ता नियंत्रण तंत्र, सुरक्षा नियम तसेच पर्यावरणपूरक उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

रसायनशास्त्र हे पदार्थांचे संघटन, संरचना, गुणधर्म व अभिक्रिया यांचा अभ्यास करणारे मूलभूत विज्ञान असून औषधनिर्मिती, खतनिर्मिती, पॉलिमर, रंगद्रव्ये व विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये त्याचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध रासायनिक प्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तयार उत्पादनांची तपासणी, शुद्धीकरण प्रक्रिया, साठवण व्यवस्था तसेच विक्रीपूर्व तयारी याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उद्योगातील तांत्रिक अधिकाऱ्यांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले व औद्योगिक कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती घेतली.

या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन, उपप्राचार्य डॉ. एस. बी. साळवे तसेच डॉ. व्ही. व्ही. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांसोबत डॉ. सी. जे. पाटील, प्रा. ए. एन. ढाके व प्रा. एल. एल. भंगाळे हे प्राध्यापक उपस्थित होते. रसायनशास्त्र विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक ज्ञानाबरोबरच करिअरच्या नव्या संधींबाबत उपयुक्त माहिती मिळाली असून ही औद्योगिक भेट यशस्वीरीत्या पार पडली.

No comments