adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

समाजभूषण पुरस्काराने श्री. वासुदेव देविदास बाविस्कर यांचा गौरव

 समाजभूषण पुरस्काराने श्री. वासुदेव देविदास बाविस्कर यांचा गौरव   शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नैसर्गिक मानवाधिकार स...

 समाजभूषण पुरस्काराने श्री. वासुदेव देविदास बाविस्कर यांचा गौरव  


शामसुंदर सोनवणे वि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम (NHRPC Forum) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 मध्ये “समाज भूषण” या प्रतिष्ठित पुरस्काराने श्री. वासुदेव देविदास बाविस्कर यांचा सन्मान करण्यात आला. 


भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत व मान्यता प्राप्त या संस्थेच्या माध्यमातून हा सन्मान प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्य, राजकारण तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना समाजातील सर्व घटकांना न्याय व समता मिळावी यासाठी श्री. बाविस्कर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट धडपड, कार्यतत्परता आणि समाजासाठी असलेली निष्ठा यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून, समाजातील दुर्बल घटकांना बळकटी देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून, पुढील काळातही समाजसेवेची वाट अधिक जोमाने चालण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

No comments