adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक महिला दिनानिमित्त शिरपूरचा गौरव : कवयित्री तथा शिक्षिका अनुपमा तवर मॅडम यांना राज्यस्तरीय ‘नारी शक्ती’ महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित.

 जागतिक महिला दिनानिमित्त शिरपूरचा गौरव : कवयित्री तथा शिक्षिका अनुपमा तवर मॅडम यांना राज्यस्तरीय ‘नारी शक्ती’  महिला सन्मान पुरस्काराने सन्...

 जागतिक महिला दिनानिमित्त शिरपूरचा गौरव : कवयित्री तथा शिक्षिका अनुपमा तवर मॅडम यांना राज्यस्तरीय ‘नारी शक्ती’  महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित. 


धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग मो. 8999838651

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धुळे:-  येथील जागतिक महिला दिनानिमित्ताने जिल्हा परिषद सभागृहात रविवार (दि. १५ मार्च २०२६ ) रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा 'राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. अत्यंत दिमाखदार आणि प्रेरणादायी वातावरणात हा सोहळा पार पडला.

धुळे येथील 'शांतीरक्षक कल्याण संस्था' (पोलिस मित्र), 'अखिल भारतीय नवोदय युवा युवती मंच' आणि 'गायत्री सोशल अँड वेलफेअर संस्था' यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य - दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

   धुळे जिल्ह्यातील सुवर्ण नगरी म्हणून प्रख्यात असलेल्या शिरपूर येथील प्रसिद्ध शिक्षण संस्था, किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एस.पी.डी.एम. (S.P.D.M.) कॉलेज मधील शिक्षिका तथा कवयित्री प्रा.अनुपमा तवर मॅडम यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'राज्यस्तरीय नारी शक्ती महिला सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा पुरस्काराचा बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला आहे.  तसेच महिला सक्षमीकरण आणि साहित्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. प्रा.अनुपमा तवर मॅडम यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून स्त्री जातीचे आणि सामाजिक विषयांवर प्रभावी भाष्य केले आहे. त्यांच्या या साहित्यिक प्रवासाची आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा भव्य - दिव्य राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच या पुरस्काराबद्दल बोलताना प्रा.अनुपमा तवर मॅडम यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून "हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या लेखणीला आणि कार्याला पाठबळ देणाऱ्या प्रत्येकाचा आहे. या पुरस्कारामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे." हा पुरस्कार मिळाल्या बद्दल कार्यक्रमात जमलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. त्यांच्या या यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, कॉलेज चे प्राचार्य, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शिरपूर शहरातील साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*विशेष मान्यवरांची उपस्थिती* - या कार्यक्रमात धुळे मनपा च्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती. मायादेवी परदेशीं, उपमहापौर सौ. ज्योत्सना पाटील, धुळे आझाद नगर पो.स्टे.च्या PSI राजश्री पाटील, नंदुरबार दामिनी पथकच्या ज्योती पाटील, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ सौ.अनुराधा भामरे, भाजपा धुळे ग्रामीण अध्यक्ष श्री. बापूसाहेब खलाने, MSW महाविद्यालयच्या श्रीमती.ज्योती बर्डे, दिशा समितीच्या सौ. हेमांगी शाम सनेर, धुळे तालुका तालीम संघांचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री.कल्याणभाऊ गरुड, शेतकरी मित्र व सामाजिक कार्यकर्ते श्री.अभय पाटील, गायत्री सोशल अँड वेलफेयर संस्थेचे चंद्रकांत येशीराव, निवेदक राकेश गाळणकर व प्रियंका कपोले यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक धुळे येथील शांती रक्षक कल्याण संस्था ' पोलीस मित्रचे पदाधिकारी धुळे जिल्हा प्रमुख सागर राणे सर, धुळे जिल्हा महिला अध्यक्षा अपूर्वा देसले ,धुळे जिल्हा महिला उपाध्यक्ष अश्विनी सोनार ,नवोदय युवा मंचचे अध्यक्ष व आयोजक प्रमुख अमितकुमार बडगुजर यांनी कार्यक्रमाची सांगता करत या पुरस्कार वितरण सोहळ्यात जमलेल्या उपस्थित मान्यवर पत्रकार आणि महिला व विद्यार्थिनी यांचे आभार मानून आपले मत व्यक्त केले..

No comments